शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परळी तहसीलवर मराठा आरक्षणासाठी धडकला ठोक मोर्चा; आंदोलन अद्याप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:19 IST

जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा , जय भवानी जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणा देत आज दुपारी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला ठोक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.

परळी (बीड ) : आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, मेगा भर्ती रद्द झालीच पाहिजे, कर्ज माफी झालीच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय यासह इतर घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज दुपारी परळी तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा धडकला. त्यानंतर सायंकाळपर्यंत परळी तहसील कार्यालया समोर मोर्चेकरणांनी ठिय्या आंदोलन केले. या ठोक मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहाभागी झाला होता. परळीचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, परळीचे तहसीलदार शरद झाडके यांनी मोर्चकरांच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले. पोलीस बंदोबस्त तगडा होता.

मराठाला समाजाला आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, धान्याला हमीभाव द्यावा, शासनाची मेगा भरती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शिवाजी चौकात बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास ठोक मोर्चासाठी मराठा समाजातील युवक जमण्यास सुरूवात झाली. 12.30 वाजता शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून व अभिवादन करून मोर्चास सुरूवात झाली. मोर्चातील गगणभेदी घोषनेने परिसर दणानूण गेला. 

एक मराठा लाख मराठा, जय भवानी-जय जिजाऊ, जय जिजाऊ-जय शिवराय अशाही घोषणा मोर्चकरी देत होते. हा मोर्चा शिवाजी चौकातून आझाद चौक, वैद्यनाथ महाविद्यालय रोड मार्ग परळी तहसील कार्यालयावर धडकला. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील, महेश डोंगरे, संजय सावंत, स्वाती नखाते, नानासाहेब जावळे, वैजनाथ सोळंके, शंकर कापसे, पुजा सोळंके, अमीत घाडगे, अन्नपुर्णा जाधव यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी आपल्या भाषणातून करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व शासना कडाडून टिका केली.         

यावेळी मोर्चेकरांसाठी वाहेद खान पठाण, उपगराध्यक्ष अय्युब पठाण व मित्र परिवाराने पिण्याच्या पाण्याची सोय केली. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता, शांततेत हा मोर्चा निघाला गणिमी काव्याने मोर्चा काढण्याचा ईशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला होतो. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पंढरपुर येथे मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यात येईल व पंढरपुर येथे मोठ्या संख्येने एकजुटीने सहभागी होण्याचे अवाहन आबासाहेब पाटील (पुणे) यांनी केले आहे.

आंदोलन अद्याप सुरु 

जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा  परळीतील मोर्चेकऱ्यांनी दुपारच्या सुमारास केली आणि अद्यापही सर्वजण या मुद्यावर ठाम आहेत. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोणताही मोर्चेकरी आपली जागा सोडणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाBeedबीडreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार