शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील दररोजच्या बाजारामुळे वाहतुकीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

गेल्या दोन महिन्यांपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचे दररोजच्या समस्यांऐवजी गुटखा पकडणे आणि क्लबच्या पत्त्यावर छापा मारून कारवाई ...

गेल्या दोन महिन्यांपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचे दररोजच्या समस्यांऐवजी गुटखा पकडणे आणि क्लबच्या पत्त्यावर छापा मारून कारवाई करणे याकडे अधिक लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये सर्व ठिकाणचे आठवडी बाजार बंद करण्यात आलेले होते. बाजार भरविण्यासाठी संपूर्ण बंदी होती. भाजीपाला विक्रीसाठी ठरवून दिलेल्या दिवशी मुभा होती.

भाजीपाला विक्रेते, हात गाडे, दुकानांच्या पाट्या, उभा राहिलेली वाहने, इत्यादी बाबी वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शहरातील रस्त्याचे नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या कडेला मोठा चढ उतार निर्माण झाला आहे. त्यासाठी साइडपट्ट्या भरून घेणे आवश्यक झाले आहे.

रस्त्यावरून वाहने खाली उतरता येत नसल्याने अनेक वाहनधारकांना नाइलाजाने आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे आणखीनच वाहतुकीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. शहरातील सावरकर चौक, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत भगवान बाबा चौक, प्रशांतनगर, बस डेपो, अण्णाभाऊ साठे चौक, मांडवा रोड, मोरेवाडी, यशवंतराव चव्हाण चौक इ. ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ही समस्या वाहनधारकांसाठी व नागरिकांसाठी दररोजची झाल्याने त्रासदायक ठरत आहे.

भाजीपाला अथवा छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे रस्त्यालगत बसू नये. खरे तर आता आठवडी बाजार सुरू करण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी आपला व्यवसाय करावा. याबाबतीत वरिष्ठांशी बोलून पुढील कारवाई करण्यात येईल.

-रमेश सोनकांबळे,

स्वच्छता निरीक्षक

010721\avinash mudegaonkar_img-20210117-wa0012_14.jpg