शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे सर्वेक्षण होणार ‘शेतकरी महामदत अ‍ॅप’च्या माध्यमातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता खरिप हंगामातील कडधान्य व बहूतांश ठिकाणी सोयाबीन हे पिक वाया गेले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाचा विशेष उपक्रम : अचूक परिस्थितीचा अहवाल केला जाणार सादर

बीड : जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता खरिप हंगामातील कडधान्य व बहूतांश ठिकाणी सोयाबीन हे पिक वाया गेले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. त्यासाठी शेतकरी महामदत अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अचुक माहिती शासनाला मिळणार असून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत केली जाणार आहे.राष्ट्रीय दुष्काळ व्यवस्थापन च्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी मार्गदर्शन व शेतकरी महामदत अ‍ॅपच्या संदर्भात माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, मंडळाधिकारी यांची उपस्थिती होती. दरम्यान या अ‍ॅपच्या माध्यमातून महसूल मंडळाताली प्रत्येकी एक गाव व त्यामधील ५ शेतक-यांच्या शेतातील महत्त्वाच्या जसे की सोयाबीन, कापूस या पिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.यावेळी महसूलचा मंडळाधिकारी, कृषी मंडळाअधिकारी व पंचायतसमितीचा कृषी अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर शेतकरी महामदत अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण केल्यानंतर तालुका स्तरावर सर्व माहिती पाठवली जाणार आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व पं.स. गटविकास अधिकारी या तिघांची समिती या अहवालाचे अवलोकन करुन जिल्हा स्तरावर हा अहवाल पाठवला जाणार आहे. या सर्व परिस्थिचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राज्य शासनाला पिकांची परिस्थिती पाठवणार आहेत. ही प्रक्रिया लवकच जिल्हाभरात राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिली.मदत तात्काळ मिळणार : शेतक-यांना होणार फायदाअ‍ॅपचा वापर पिकांची परिस्थिती कशी आहे याचा अहवाल तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे हा अहवाल तात्काळ राज्य शासनापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.तसेच यामध्ये आर्थिक मदत देणे गरजेचे आहे असे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचा निधी वापरला जातो.त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकºयांना याचा फायदा होणार आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र