शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील २९ शाळांची मोठी दुरुस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 23:33 IST

समग्र शिक्षा अतंर्गत जिल्हयातील २९ जि. प. शाळांच्या मोठया दुरस्तीसाठी मान्यता देण्यात आली असून यासाठी १ कोटी १४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ९५ टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअखेर मुहूर्त : १ कोटी १४ लाख ६४ हजाराचा निधी मंजूर; शाळा समितीकडे वर्ग होणार

बीड : समग्र शिक्षा अतंर्गत जिल्हयातील २९ जि. प. शाळांच्या मोठया दुरस्तीसाठी मान्यता देण्यात आली असून यासाठी १ कोटी १४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ९५ टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. उर्वरित शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथील उर्दू शाळेसाठी ५ लाख ८४ हजार रुपये, राडी जि. प. माध्यमिक शाळेसाठी ५ लाख ७८ हजार रुपये, तर घाटनांदुर शाळेसाठी ३ लाख ४८ हजार व साकेफळ येथील उर्दू शाळेसाठी ५ लाख ४३ हजाराचा निधी मंजूर केला आहे.आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील शाळेसाठी ३ लाख ९० हजार, टाकळी शाळेसाठी २ लाख ७५ हजार, धारूर तालुक्यात चोरंबा शाळेसाठी ४ लाख ७४ हजार, सोनीमोहा येथे १ लाख ३१ हजार, आसोला शाळेसाठी ४ लाख ९२ हजार, चारदरी येथील शाळेसाठी ३ लाख ३७ हजार, फकीर जवळा शाळेसाठी २ लाख ६१ हजार रुपये निधी मंजूर झाला. केज तालुक्यातील तांबवा शाळेसाठी ४ लाख ९८ हजार, लाडे वडगाव शाळेला ४ लाख ९९ हजार, सादोळा शाळेसाठी २ लाख २२ हजार तर उंदरी येथील शाळा दुरुस्तीसाठी ५ लाखांचा निधी मिळणार आहे. गेवराई तालुक्यातील रुई १ लाख ६४ हजार, खेर्डा ३ लाख २३ हजार मन्यारवाडी ३ लाख ५७ हजार तर नवे बोरगाव येथील शाळेसाठी ५ लाख २३ हजाराचा निधी उपलब्ध होणार आहे. वडवणी येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा व जि. प. मुलींच्या शाळेसाठी प्रत्येकी ४ लाख ९९ हजार, खडकी शाळेसाठी २ लाख २४ हजार , खळवट लिंबगाव व साळिंबा शाळेला प्रत्येकी ४ लाख ९९ हजार तर बोहगव्हाणच्या शाळेसाठी ४ लाख ७१ हजार रुपये निधी मंजूर झाला. पाटोदा तालुक्यातील चिखलीनाथ शाळेला ५ लाख , वैद्यकिन्ही २ लाख २१ हजार तर शिरुर तालुक्यातील हिवरसिंगा शाळेसाठी २ लाख ५० हजार तर परळीतील हिवरा गोवर्धनच्या शाळेला २ लाख ५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र