कारवाईची मागणी
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. त्रास शेतकऱ्यांना होत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
विजेचा लपंंडाव
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वीज प्रवाह खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, तसेच याचा मोठा फटका छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे.