शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:12 IST

मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. 

ठळक मुद्दे. पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून चोर आले तीन चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट

अंबाजोगाई : भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांची शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील सायगाव नाका परिसरात असलेली अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था फोडून चोरट्यांनी ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आली. मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.  अक्षय मुंदडा हे अंबाजोगाई नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात या पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर जमा झालेली २ लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम कुलुपबंद कपाटात ठेऊन सर्व कर्मचारी कार्यालय बंद करून निघून गेले. शनिवारी पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. शनिवारी सकाळी ६.३० वाजता ही चोरी उघडकीस आली असे पतसंस्थेचे व्यवस्थापक रामलिंग गुरुलिंगअप्पा सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. 

अक्षय मुंदडा यांनी खबर दिल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय कांबळे करत आहेत. मागील काही कालावधीत अंबाजोगाई शहरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने आहे. चोरट्यांनी थेट आमदारांची पतसंस्था फोडली तिथे आपल्या घरांच्या सुरक्षिततेचे आय होणार या चिंतेने सर्वसामान्य नागरिकात दहशत पसरली आहे.  चोरटे सीसीटीव्हीत कैद :दरम्यान, पतसंस्थेसमोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत. पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. सदर फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. तसेच, पोलिसांना चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळाले असून ठशांची शहानिशा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीBeedबीड