शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव खाजगी बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 12:17 IST

या अपघातात तीस प्रवासी बालंबाल बचावले

दिंद्रुड ( बीड) : अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने खाजगी बस रस्त्याच्या खाली गेल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० प्रवासी बालंबाल बचावले. 

नांदेड येथील एक खाजगी ट्रॅव्हल्स (एम.एच.०९ सिव्ही  ०७३६) पुणे येथे 30 प्रवासी घेऊन निघाली होती. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडजवळ बीड- परळी हायवे वर एका पुलाच्या शेजारी तिचा स्टेअरिंग रॉड तुटला. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीवर कसाबसा ताबा मिळवत ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या बाजुला घेतली. 

यावेळी काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. शेख रहमान गाडी मालकाचे नाव असल्याची माहिती चालकाकडून मिळाली. यावेळी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. गाडीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून आले. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. लांब पल्ल्याच्या गाड्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. सदरील खाजगी बस जुनी असल्याचे निदर्शनास येत आहे. चालक-मालकाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र यापुढे चालक-मालकाने काळजी घेण्याची आवश्यक असल्याची चर्चा प्रवाशांत आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड