शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

प्रशासनाची बेफिकिरी; कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ती प्रसूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 14:14 IST

कडाक्याच्या थंडीत बाळाला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेने उपचाराला नकार देत जिल्हा प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली.

बीड : घरी अठरा विश्वे दारिद्र्य, ना राहायला घर, ना हाताला काम, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत... अशातही घरकुल मंजूर झाले. मात्र, ना जागेचा कायदेशीर ताबा मिळाला ना अनुदान आले. त्यामुळे एक कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून उपोषणाला बसले. यातील एका महिलेची ३ फेब्रुवारी रोजी पहाटे प्रसूती झाली. (Protester women's delivery in front of the Beed Collector's office) कडाक्याच्या थंडीत बाळाला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेने उपचाराला नकार देत जिल्हा प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली.

व्यवस्थेने केलेल्या अन्यायामुळे पिढ्यान्पिढ्या परवड झालेल्या एका समाजातील हे कुटुंब बीड तालुक्यातील वासनवाडी येथील आहे. अप्पाराव भुजा पवार यांना दोन वर्षांपूर्वी शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले; परंतु लालफितीच्या कारभारात ते अडकले. जागेचा मालकीहक्क व घरकुलाचा हप्ता मिळावा यासाठी अप्पाराव पवार यांनी प्रशासनाचे उंबरठे झिजविले. मात्र, प्रश्न मार्गी लागला नाही. तीन महिन्यांत दोन वेळा आंदोलने करूनही दखल न घेतल्याने २४ जानेवारी २२ पासून ते कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. कविता अप्पाराव पवार, बाबा अप्पाराव पवार, गणेश चंदर पवार, अप्पाराव यांची पुतणी मनीषा विकास काळे, असे सगळे आंदोलन करत आहेत. मनीषा काळेला ३ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता प्रसववेदना जाणवू लागल्या. अंधाऱ्या रात्री ओट्यावरील पाणवठ्याच्या आडोशाला तिने मुलाला जन्म दिला. तीन वर्षांची पल्लवी व दीड वर्षाचा परशा ही तिला पहिली दोन मुले असून, आता हा नवा पाहुणा आला आहे.

उपचारास नकार, माय-लेक ठणठणीत३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. केतन राठोड हे रुग्णवाहिकेसह आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र, उपचार घ्यायचा नाही, असा पवित्रा अप्पाराव पवार यांनी घेतला. त्यामुळे पोलीस माघारी परतले. माय-लेक ठणठणीत आहेत. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत प्रशासन सुस्तच होते.

आसू अन् हसू...मांगवडगाव (ता. केज) येथे जमिनीच्या वादातून तिघांची निर्घृण हत्या केल्याची घटना २०२० मध्ये झाली होती. यातील मयत प्रकाश पवार यांची मनीषा काळे ही मुलगी आहे. वडिलांच्या ५ मारेकऱ्यांना २ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दुसऱ्याच दिवशी मुलगा झाल्यामुळे मनीषाच्या एका डोळ्यात आसू, तर दुसऱ्यात हसू होते.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडagitationआंदोलनpregnant womanगर्भवती महिला