शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये जाळपोळीतील आरोपीच्या एमपीडीए प्रस्तावाला शासनाकडून मंजूरीच नाही

By सोमनाथ खताळ | Updated: May 4, 2024 17:05 IST

हे कसले गतीमान शासन? जाळपोळीतील मुख्य आरोपीच्या नावे दिलेला प्रस्ताव मंजुरच नाही झाला, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मागे

बीड : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये झालेल्या जाळपोळीतील मुख्य आरोपी असलेल्या गाेरक्षनाथ उर्फ पप्पू शिंदे (रा.केसापुरी परभणी, ता.बीड) नामक आरोपीवर एमपीडीए कारवाई करण्यात आली होती. परंतू जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी आदेश केल्यानंतर पाठविलेल्या प्रस्तावाला शासनाकडून १२ दिवसांच्या आत मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आपलाच आदेश रद्द करावा लागला. कुख्यात आरोपींबाबतही गांभीर्याने घेतले जात नसल्याने हे कसले गतीमान शासन? असा सवाल उपस्थित होत आहे.

३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. हे प्रकरण अधिवेशनासह राज्यभर गाजले. यामध्ये पप्पू शिंदे हा मुख्य आरोपी होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. परंतू नंतर तो जामिनावर बाहेर आला होता. त्याच्याविरोधात पिंपळनेर, बीड शहर, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच बीड शहर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. याला १९ एप्रिल रोजी मंजूरीही मिळाली. त्यानंतर त्याला स्थानबद्ध करत हर्सूल कारागृहात पाठविले. २६ एप्रिलला पप्पूचे वडिल रामप्रसाद श्रीरंग शिंदे यांनी अर्ज केला. शिंदे यांच्या वकिलांनी सर्व कायदेशीर बाबी मांडत याला आव्हान दिले. शासनाकडून १२ दिवसांत मंजूरी न मिळाल्याने हा आदेश मागे घेण्याची वेळ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना आली. शिंदे यांच्यावतीने ॲड.विशाल कदम यांनी काम पाहिले.

शासनाला गांभीर्य नाही का?जाळपोळ, जीवे मारण्याचा प्रयत्न, कट रचणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असतानाही शासनाने जिल्हाधिकारी मुधोळ यांनी पाठविलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. ३० एप्रिलपर्यंत म्हणजेच आदेशानंतर १२ दिवसांत शासनाने मंजूरी न दिल्याने एमपीडीएची कारवाई रद्द करण्यात आली.

वेळेत परवानगी मिळाली नाहीपप्पू शिंदेवर १९ एप्रिल रोजी कारवाई झाली होती. आम्ही पाठवलेल्या प्रस्तावाला ३० एप्रिलपर्यंत शासनाकडून परवानगी मिळणे अपेक्षित होते, परंतू ती मिळाली नाही. त्यामुळे एमपीडीए ॲक्ट १९८१ चे कलम ३ (३) नुसार ही कारवाई आपोआप रद्द होते. त्यानुसार आम्ही आदेश पारीत केला.- दीपा मुधोळ, जिल्हाधिकारी बीड

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी