शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:05 IST

तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे, कोणता तपास झाला हे जाहीरपणे सांगावे

केज/परळी : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे हा ७१ दिवसांपासून फरार आहे. हे कशाचे द्योतक आहे? असा प्रश्न उपस्थित करून बीड जिल्ह्यातील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. खा. सुळे यांनी देशमुख व परळीतील महादेव मुंडे कुटुंबाची मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची खा. सुळे यांनी भेट घेत सांत्वन केले. जोपर्यंत देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. बीड जिल्ह्यातील गुंडा गर्दी संपली पाहिजे, बीडमधील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे. गावकऱ्यांनो, सामूहिक अन्नत्याग आंदोलन करू नका, असे आवाहन खा. सुळे यांनी केले. या प्रकरणातील सर्व गुन्हेगार व पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या सर्वांचे सरपंच हत्येपूर्वीपासूनचे व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्यादरम्यानचे सीडीआर काढून दोषी अधिकारी शोधले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणातील तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे, कोणता तपास झाला हे जाहीरपणे सांगावे, असेही खा. सुळे म्हणाल्या.

न्यायालयीन चौकशीचे स्रोत वाढवा - आ. जितेंद्र आव्हाडबीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने ज्यांनी, ज्यांनी गुन्हे केले आहेत, अशा अन्यायग्रस्तांची बीड जिल्ह्यात मालिकाच घडली आहे. दोन वर्षांत जिल्ह्यात धुमाकूळ घालून वाटेल तसे गुन्हे करण्यात आले आहेत. हे धक्कादायक असून यांची उकल होण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे स्रोत वाढविले पाहिजेत, अशी भूमिका आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

राजीनामा दिला की सर्वच आरोपी फासावर चढतील - आ. संदीप क्षीरसागरमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला की सर्वच आरोपी फासावर चढतील. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, ही आपली मागणी आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी पंकज कुमावत यांना जिल्ह्यात बोलाविण्यात येण्याची मागणीही त्यांनी केली.

सामूहिक अन्नत्याग आंदोलनावर गावकरी ठामआमच्या मागण्या प्रशासनाने २५ फेब्रुवारीपर्यंत मंजूर कराव्यात, नसता आम्ही सामूहिक अन्नत्याग आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मस्साजाेग ग्रामस्थांनी यावेळी मांडली.

हत्येला अनैतिक संबंधाचे वळण देण्याचा प्रयत्न - धनंजय देशमुखभावाची हत्या झाल्यानंतर रुग्णवाहिका केज पोलिस ठाणे अथवा रुग्णालयात नेण्याऐवजी कळंबकडे नेली जात होती. कळंबमध्ये एक महिला तयार होती. तिला पैसे देऊन छेडछाडीचा आरोप करायचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन होता; परंतु ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने हा प्लॅन फसला. जर ग्रामस्थांनी पाहिले नसते तर अनैतिक संंबंधाचे वळण दिले असते, असा आरोप धनंजय देखमुख यांनी केला. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या असून, अनेकांना समाजातून उठवून लावल्याचेही ते म्हणाले.

महादेव मुंडेंची पत्नी उपोषणावर ठामपरळीतील महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचीही खा. सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आरोपींना अटक का होत नाही, असा प्रश्नही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर उपस्थित केला. खा. सुळे यांनी फोनवरून बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संवाद साधला. या खून प्रकरणातील आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळाला असे वाटणार नाही. पोलिसांनी आजपर्यंत तपास केला नाही. पोलिस प्रशासन दोषी आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आपण उपोषण करण्यावर ठाम असल्याचेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण