शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

चिमुकला खेळताना वाट चुकला; फेसबुकवरील फोटो पाहून म्हणाला, हेच माझे पप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:49 IST

बीडमध्ये तीन तासानंतर हरवलेला चिमुकला पुन्हा आईच्या कुशीत

बीड : शहरात आजोळी आलेला जेमतेम चार वर्षांचा चुणचुणीत, गोंडस अन् निरागस चिमुकला. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता खेळताना वाट चुकला अन् दीड किमी अंतर भटकत राहिला. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याची आपुलकीने चौकशी केली. इकडे आईही त्याला शोधत होती. अखेर सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांच्या प्रयत्नाला तीन तासानंतर यश आले. फेसबुकवरील फोटो पाहून त्याने वडिलांना ओळखले अन् आनंदाने आईच्या कुशीत शिरला.

त्याचे झाले असे, नेकनूर (ता. बीड) येथील चार वर्षांच्या मुलाचे आजोळ अंबिका चौक परिसरात आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आई घरकामात व्यस्त होती. खेळता-खेळता चिमुकला घरापासून दूर आला. पुन्हा परतीचा रस्ता न सुचल्याने तो चुकून पिंपरगव्हाण रस्त्याने चालत राहिला. या रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते किशोर गिराम यांचे घर आहे. त्यांची नजर या बालकाकडे गेली. हा रस्ता थेट नदीच्या दिशेने जाणारा होता. त्याच्या मागे-पुढे कोणी नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यास जवळ घेऊन विचारपूस केली. त्याला आई-वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. तो वाट चुकल्याचे स्पष्ट झाल्यावर गिराम यांनी उपअधीक्षक संतोष वाळके यांना माहिती दिली. त्यानंतर गिराम हे चिमुकल्याला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात पोहोचले. इकडे त्याची आई त्याला शोधतच होती. शिवाजीनगर ठाण्यात आईला पाहून मुलाने दुडुदुडु धावत मिठी मारली. तेव्हा उपस्थित पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.

चॉकलेट, बिस्कीट देताच चेहऱ्यावर आनंदशिवाजीनगर ठाण्यात गेल्यावर चिमुकल्याच्या चेहऱ्यावर दडपण हाेते. पो. नि. केतन राठोड, अंमलदार कुमार काळे, गणेश परजणे, पुष्पा भोसले यांनी त्यास धीर दिला. त्याच्यासाठी चॉकलेट, बिस्कीट मागवले. मायेने जवळ घेऊन त्याला बिस्कीट, चॉकलेट दिल्यावर त्याचा चेहरा खुलला. त्यानंतर त्यास पोलिसांनी बोलते केले.

आईचे नाव मम्मी, वडिलांचे नाव पप्पा...चिमुकला आईचे नाव मम्मी, तर वडिलांचे नाव पप्पा असे सांगत होता. बऱ्याच वेळानंतर त्याने वडिलांचे खरे नाव व आडनाव सांगितले. पोलिसांनी फेसबुकवर हे नाव सर्च केले. वडिलांचा फोटो पाहून मुलाने हेच माझे पप्पा, असे सांगितल्यावर त्यावरील मोबाइलवर संपर्क करून पोलिसांनी हकिकत कळवली.

पालकांनी मुलांची काळजी घ्यावी स्थानिकांच्या सतर्कतेमुळे त्यांनी मुलाला सुरक्षित पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे त्याच्या पालकांचा शोध घेता आला. पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी.- केतन राठोड, पो. नि. शिवाजीनगर ठाणे

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी