शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी बोकडाचा मृत्यू, संतापलेल्या शेतकऱ्याने तेच बोकड टांगले दवाखान्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 22:44 IST

केज तालुक्यातील आंधळेवाडी येथील शहादेव आंधळे यांनी आठ महिन्यांपूर्वी शेळीपालनासाठी विडा येथील मराठवाडा ग्रामीण बँकेकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते.

मधुकर सिरसाटकेज : आजारी बोकडाला विडा येथील पशू दवाखान्यात वेळेवर उपचार मिळाले नाही. त्याने ओरडून ओरडून जीव सोडला. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने मृत बोकडच थेट पशू दवाखान्याच्या गेटला टांगून संताप व्यक्त केला. ही घटना विडा येथे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. टांगलेले मृत बोकड पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

केज तालुक्यातील आंधळेवाडी येथील शहादेव आंधळे यांनी आठ महिन्यांपूर्वी शेळीपालनासाठी विडा येथील मराठवाडा ग्रामीण बँकेकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यातून नेकनूरच्या बाजारातून ७ शेळ्या व १ बोकड खरेदी केला. आंधळेवाडी शिवारात गुरुवारी दुपारी शेळ्या चारत असताना चार महिन्यांचा बोकड अचानक ओरडू लागला. बोकडाचा आवाज बंद होत नसल्यामुळे आंधळे यांनी त्याला विडा येथील पशू रुग्णालयात आणले. परंतु, दवाखान्याच्या गेटला कुलूप होते. शिपाई दुपारी २ वाजताच दवाखाना बंद करून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, काही वेळातच बोकडाचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकाऱ्याला उत्तरीय तपासणी फोन केला असता 'उद्या सकाळी तुमच्या घरी येऊन बोकडाची उत्तरीय तपासणी करण्यात येईल' असे उत्तर मिळाले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने बोकड दवाखान्याच्या गेटला बांधून निषेध नोंदविला. उपचाराअभावी बोकडाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे आठ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, विडा येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त असून मस्साजोगचे पशुधन विकास अधिकारी येथील अतिरिक्त पदभार सांभाळतात, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. श्रीकृष्ण थळकरी यांनी दिली.

पशुधन विकास अधिकारी सहलीलापरळी, अंबाजोगाई व केज तालुक्यातील शेतकऱ्यांची सहल कामधेनू योजनेअंतर्गत परभणी येथे गेली होती. यात मीदेखील आहे. त्यामुळे रुग्णालयात येऊ शकलो नाही. शिपाई शेजारच्या गावात जनावरांवर उपचारासाठी गेलेला होता. त्यामुळे पशू रुग्णालय बंद होते. -डॉ. दीक्षांत जोगदंड, प्रभारी पशुधन विकास अधिकारी, विडा