शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गडावरील नाथांचा आशिर्वाद मिळालाच; पण राजकारणात गोपीनाथांचादेखील आशिर्वाद मिळाला- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 15:23 IST

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या 47वा पुण्यातिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्खमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते.

नितीन कांबळे

कडा- नाथ संप्रदायातील गडावर येऊन नाथांचा आशिर्वाद तर मिळालाच, पण त्याबरोबर गोपीनाथांचादेखील आशिर्वाद मिळाला, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. याशिवाय, गडावरील प्रलंबित आराखडा लवकर मंजुर करून सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या 47वा पुण्यातिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आ.साहेबराव दरेकर, माजी आ. भिमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार , आ.मोनिका राजळे, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, सतिश शिंदे, दादा विधाते, गणेश कराड,  कुंडलिक खाडे, आदिची उपस्थिती होती.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  हा ध्वज नव्हे ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे. महाराज आपला आणि गडाचा सेवेकरी म्हणुन काम करत राहीन. नाथांचा आर्शिवाद घेण्यासाठी गडावर आलोय. नाथांचा तर आशिर्वाद मिळालाच, पण राजकारणात गोपीनाथांचा आर्शिवद मला मिळाला.मराठवाड्यातील पंढरी ही गहिनीनाथ गडावर आहे. हेलीकॉप्टरमधून भक्तांचा महासागर पाहायला मिळाला. देश, देव, धर्म ,संतामुळे वाचला आहे. संस्कार, संस्कृती वारकरी संप्रदायामुळे जिवंत आहे. पंढरीच्या वारी रस्ताकामाचा प्रश्न मार्गी लावू. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी मंजुर केलेला आराखडा पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

मागच्या काळात मराठवाड्य़ाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केले, पण अडचणी आल्या होत्या. येत्या काळात समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणुन मराठवाड्यात पाणी आणण्याचा प्रयत्न लवकरच करणार. मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी भगिरथ प्रयत्नाला यश मिळावे, हाच आशिर्वाद वामनभाऊनी द्यावा असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीड