शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता अ‍ॅप’कडे बीडकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:13 IST

हातात अँड्रॉईड मोबाईल असतानाही शहर स्वच्छतेसाठी उघडण्यात आलेले ‘स्वच्छता अ‍ॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास बीडकर उदासिन असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देउद्दिष्ट चार हजारांचे, डाऊनलोड केवळ २२४५

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हातात अँड्रॉईड मोबाईल असतानाही शहर स्वच्छतेसाठी उघडण्यात आलेले ‘स्वच्छता अ‍ॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास बीडकर उदासिन असल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून जनजागृती करूनही आतापर्यंत केवळ २२४५ लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. पालिकेला १ जानेवारीपर्यंत किमान ४ हजार अ‍ॅपचे उद्दीष्ट होते. फेब्रुवारी महिन्यात समिती तपासणीसाठी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहर स्वच्छतेसाठी नगर पालिकेने पाऊले उचलली आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता कशी करता येईल याबाबत प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील शहरांनी सहभाग नोंदवला आहे. गतवर्षीही हे सर्वेक्षण झाले होते. यात बीडचा ३०२ वा क्रमांक होता.यावेळी मेहनत करण्यासाठी पालिकेला वेळ मिळाला आहे. त्यामुळे शिपायापासून मुख्याधिकारी, नगराध्यक्षांपर्यंत स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून या सर्वेक्षणांतर्गत ‘स्वच्छता अ‍ॅप’ सुरु करण्यात आले. प्रत्येकाला या अ‍ॅपद्वारे आपल्या परिसरातील तक्रारी पालिकेपर्यंत पोहचविण्याची सुविधा उपलब्ध केली.परंतु प्रत्यक्षात बीडकरांमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळून येत नसल्याचे दिसून येते. १ जानेवारीपर्यंत बीड पालिकेला ४ हजार अ‍ॅप डाऊनलोडचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात केवळ २२४५ अ‍ॅप डाऊनलोड केल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.पालिकेची वारी, महाविद्यालयांच्या दारीअ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यासाठी पालिका आता महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहे. यामध्ये मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके, समन्वयक वसीम पठाण, स्वच्छता निरीक्षक आर. एस. जोगदंड, भारत चांदणे, भागवत जाधव, सुनील काळकुटे, ज्योती ढाका, गौरव दुधे, श्रध्दा गर्जे हे अ‍ॅप डाऊनलोडचे आवाहन करीत आहेत. तसेच अनेकांच्या घरी व दुकानांना भेटी देऊन याबाबत जनजागृती केल्याचे विभाग प्रमुख तिडके यांनी सांगितले.गेम अन् चॅटिंगमध्ये व्यस्तअँड्रॉईड मोबाईल हाती असतानाही स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले जात नाही. या अ‍ॅपमुळे आपल्याला काय फायदा आहे हे वारंवार जनजागृतीमधून सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उलट गेम अ‍ॅन् सोशल मीडियावर चॅटिंग करण्यातच बीडकर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.