शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दहा महिन्यांत बीड जिल्ह्यातील १६२ बालके कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:16 IST

बीड जिल्ह्यात मध्यंतरी कुपोषित बालके वाढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. जी बालके जिल्हा रूग्णालयात दाखल झाली, त्यांच्यावर विशेष कक्षात औषधोपचार करून त्यांना कुपोषणमुक्त करून घरी पाठविले. दहा महिन्यात १६२ तीव्र कुपोषित बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात मध्यंतरी कुपोषित बालके वाढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. जी बालके जिल्हा रूग्णालयात दाखल झाली, त्यांच्यावर विशेष कक्षात औषधोपचार करून त्यांना कुपोषणमुक्त करून घरी पाठविले. दहा महिन्यात १६२ तीव्र कुपोषित बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या तत्परतेमुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आकडा कमी होत असल्याचे सांगण्यात आले.

माजलगाव येथील एका पालावर एका कुटूंबात दोन बालके कुपोषित आढळल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याबाबत माध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. प्रत्येक आंगणवाड्यांसह पालांवर जावून बालकांच्या तपासणीचे आदेश दिले. विशेष पथके नियुक्त केली. यामध्ये अनेक बालके तीव्र व मध्यम कुपोषित आढळली होती. यातील १६२ बालके जिल्हा रूग्णालयात दाखल झाली होती.

या बालकांवर विशेष कक्ष क्रमांक ९ मध्ये (१० खाट) उपचार करण्यात आले. तसेच मातांचे समुपदेशन करून बालकांना पोषक आहार देण्यात आला. १४ दिवस ही प्रक्रिया झाल्यानंतर ही सर्व बालके कुपोषणमुक्त होऊन घरी परतल्याचे डॉ.हनुमंत पारखे यांनी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, डॉ. सतीष हरीदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हनुमंत पारखे, डॉ. दीपक लांडे, डॉ. योगेश जाधव, आहारतज्ज्ञ सावित्री कचरे यांच्यासह कक्षातील सर्व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.मातांना भत्ता आणि जेवणरूग्णालयात दाखल असलेल्या कुपोषित बालक रूग्णांच्या मातांना (किंवा नातेवाईकांना एका) ५० रूपये भत्ता दिला जातो. तसेच त्यांना सकाळी नाश्तासह दोन वेळा जेवन दिले जाते. त्यामुळे रूग्णालयात दाखल होणाºया रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. नागरिकांनीही मुलांना कुपोषणाची लक्षणे दिसताच दाखल करावे, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले आहे.