शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या स्मरणार्थ भावंडांनी बांधले मंदिर; ९ लाख रुपये खर्च; मूर्तीकडे पाहताच दिसते आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 06:57 IST

मंदिरासाठी तीन भावांनी पैशांची बचत केली. याच पैशांतून १० बाय १३ जागेमध्ये मंदिराचे बांधकाम चालू केले. 

अनिल गायकवाड

लोकमत न्यूज नेटवर्क कुसळंब (जि.बीड) :  ‘आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते...’ या कविवर्य फ. मुं. शिंदे यांच्या ओळी मातृप्रेमाची साक्ष देतात; पण आई लेकरांना सोडून जाते तेव्हा पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात... तरीही आई लेकरांसाठी कायमच उजेड दाखवणारी समईतली जागा असते. आईची हीच आठवण जपण्यासाठी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील तीन भावांनी चक्क तिचे मंदिर बांधले आहे.  सावरगाव घाट येथील शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचे १८ मे २०२२ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 

असे साकारले मंदिर n मंदिरासाठी तीन भावांनी पैशांची बचत केली. याच पैशांतून १० बाय १३ जागेमध्ये मंदिराचे बांधकाम चालू केले. n सहा महिन्यांत हे काम पूर्ण झाले. पुण्यातील कातोरे नावाच्या मूर्तिकाराकडून पावणेतीन फूट उंचीची मूर्ती बनवून घेण्यात आली. n १८ मे २०२३ रोजी पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला. या मूर्तीकडे पाहिले की आई समोर असल्यासारखी वाटते, अशी भावना या भावंडांनी व्यक्त केली. 

आई तर गेली, पण तिला विसरणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही तिन्ही भावांनी आईचे मंदिर बांधण्याची संकल्पना मांडली. यामुळे आई रोज आपल्याला दिसेल आणि ती कायम स्मरणात राहील. पुढील पिढीसुद्धा आपल्या आईला विसरणार नाही.          - राजेंद्र खाडे, मुलगा