वडवणी : सध्या उन्हाची चाहूल लागली असून दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील वन खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे वृक्षतोड वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत असल्याचे मत वृक्षप्रेमीतून व्यक्त होत आहे.
पाणी संवर्धनाची जबाबदारी घ्यावी
वडवणी : तालुक्यात यावर्षी पाऊस समाधानकारक झालेला आहे. गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीसारखे ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या झळा बसू नये म्हणून प्रत्येकाने पाणी संवर्धनाची जबाबदारी घ्यावी, असे मत तहसीलदार वैशाली पाटील यांनी येथे केले
सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था
वडवणी : शहरातील बाजार तळावर उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली असून यामुळे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांनी यांनी केली आहे.