शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१२२ वर्षांची परंपरा, निजाम काळापासून टेंबे गणपतीचे भाद्रपद एकादशीला होते आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 17:51 IST

यावर्षी दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी वहीपेन श्रीचरणी अर्पण करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे

माजलगाव (बीड) : माजलगावचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्री. ढुंढीराज टेंबे गणपतीची मंगळवारी भाद्रपद एकादशीला विधीवत स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या दुपारी ३ वाजता गावातून मिरवणूक निघून सायंकाळी ७ वाजता विधीवत पुजा करून टेंबे गणपतीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनंतदेवा जोशी यांनी दिली आहे.

निजामकालिन राजवटीत सन १९०१ साली माजलगावात टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आली. आजतागायत मंडळाने सर्व परंपरा जोपासल्या आहेत. शहरातील सर्वांत जुन्या गणपती मंडळाला ऐतिहासिक वारसा आहे. १२२ वर्षांची परंपरा असलेले टेंबे गणेश मंडळ गणेशोत्सवात विविध समाजापेयागी कार्यक्रमांचे आयोजन करते. यावर्षी देखिल मंगळवार ते रविवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या भाद्रपद एकादशीला टेंबे गणपतीची स्थापना होणार तर रविवारी दि. ११ सप्टेंबर रोजी भाद्रपद प्रतिपदेस विसर्जन होणार आहे. दरम्यान, दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी वहीपेन श्रीचरणी अर्पण करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनंतदेवा जोशी यांनी केले आहे. विसर्जनानंतर या शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. 

परवानगीसाठी घोड्यावर गेले होते हैद्राबादलासन १९०१ साली मराठवाड्यावर निजामाचे शासन होते. त्यावेळी शहरातील काही भाविकांनी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. मात्र, मिरवणूकीस परवानगी नसल्यामुळे निजामांनी स्थापना मिरवणूक अडविली. त्यामुळे गणेश मंडळाच्या सदस्यांनी घोड्यावर थेट हैद्राबाद गाठत ताम्रपटावर स्थापना परवानगी आणली होती. तसेच १२२ वर्षांपूर्वी विजेची सोय नव्हती. विसर्जन मिरवणुकीत प्रकाश असावा म्हणून लाकडाला कापड गुंडाळुन त्यावर तेल टाकून आगीचे टेंबे तयार करण्यात आले. या टेंब्याच्या प्रकाशात मिरवणूक निघाली. हीच परंपरा आजतागायत सुरूच आहे. 

टॅग्स :BeedबीडGanesh Mahotsavगणेशोत्सव