शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, महादेव मुंडेला कोणी मारले? विशेष पथकाकडून ३ संशयितांची चौकशी, काहींनी परळी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:59 IST

विशेष पथकामुळे १६ महिन्यांनंतर तपासाला गती

बीड : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला विशेष पथकामुळे १६ महिन्यांनंतर गती आली आहे. संशयित असलेल्या तिघांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून दोन दिवस चौकशी करण्यात आली. महादेव मुंडेला कोणी मारले? काय कारण होते? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले आहेत. परंतू संशयितांनी आम्ही केलेच नाही, असा स्टँड घेतला.

परळी शहरातील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ रोजी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु त्याचे आरोपी शोधले नव्हते. हे प्रकरण शांतही झाले होते. परंतु मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महादेव मुंडे यांचे खून प्रकरणही समोर आले. भाजपचे आ. सुरेश धस यांच्यासह इतरांनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाचा तपास परळी शहर पोलिसांकडून काढून घेत अंबाजोगाईचे उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे दिला. परंतु त्यांनीही तपासात काहीच न केल्याचा आरोप महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. तसेच उपाेषणाचा इशाराही दिला. त्यावर पुन्हा काँवत यांनी पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पाच जणांचे विशेष पथक मदतीला दिले. या पथकाने परळीतील तीन संशयिताना दोन दिवस पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून चौकशी केली. तसेच इतरही लोकांचा शोध सुरू आहे. आठवडाभरात आणखी लोकांना चौकशीसाठी आणले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुळेनंतर धसांनी घेतली भेटशरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर भाजपा आ. सुरेश धस यांनीही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

८ साक्षीदारही तपासलेसंशयितांची तर चौकशी केलीच, शिवाय आठ साक्षीदारही या प्रकरणात तपासण्यात आले. यात काही महिलांचाही समावेश आहे.

काहींनी परळी शहर सोडलेमुंडे खून प्रकरणात ज्या लोकांवर संशय होता, असे अनेकजण परळी शहर सोडून पसार झाल्याचीही माहिती आहे. विशेष पथकाने नातेवाइकांमार्फत त्यांना निरोप देऊन चौकशीला हजर राहण्याचे सांगितले आहे. जर स्वत:हून हजर झाले नाहीत, तर त्यांना पोलिस खाक्या दाखवून आणण्याचा इशाराही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुन्हा उघड करण्यासाठी पूर्ण प्रयत्नआतापर्यंत १० ते १५ लोकांची चौकशी केली आहे. आमचे पथक हा गुन्हा उघड करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. यात यश येईल, अशी अपेक्षा आहे. जर कोणाला काही माहिती द्यायची असेल तर थेट मला काॅल करावा, नाव गोपनीय ठेवले जाईल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड