शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, जगायचं कसं? भटक्या समाजाचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:51 IST

टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे.

बीड : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे. त्यामुळे आता झोपडीबाहेर पडायचीसुद्धा भीती वाटत आहे. झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, असा जगण्यातील रोजचा संघर्ष डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी ‘लोकमत’जवळ मांडला.मागील काही महिन्यांपासून मुले पळविणारी टोळी समजून भिक्षुकी, भिकारी, भंगारवाले, गोसावी आदी भटक्या समाजातील नागरिकांसह परराज्यातून आलेल्या लोकांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाने ठेचून मारल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे भटक्या समाजातील लोक अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत.याच प्रश्नावर बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर अ.भा. बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विविध संघटना, समाजातील नागरिकांनी गुरुवारी मोर्चा काढला. मोर्चा संपल्यानंतर जमलेल्या विविध समाजातील नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला.घटनेनंतर दोन दिवस आमच्या घरातील एकही जण बाहेर पडला नाही. त्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागले, असे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Beedबीडnewsबातम्या