शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळा वाऱ्यावर सोडून शिक्षक गेले वारीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:59 IST

शिक्षक शाळा वाऱ्यावर सोडून वारी यात्रेला गेल्याचा प्रकार पालकांनी उघडकीस आणला

ठळक मुद्देमुख्याध्यापक भागिनाथ बांगर हे पंढरपूरच्या वारीला गेल्याचे समजले.एकूण १९ पैकी १२ शिक्षकच प्रत्यक्षात हजर होते.

बीड : आषाढी एकादशीची सुटी नसताना शिरुर कासार येथील  जि.प.शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळा वाऱ्यावर सोडून वारी यात्रेला गेल्याचा प्रकार पालकांनी उघडकीस आणल्यानंतर जि. प. सीईओ यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर काही वेळेतच गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तर आष्टी तालुक्यातील गहूखेल येथील शाळा चक्क बंदच होती, याप्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार केली. 

आषाढी एकादशी निमित्त पालक बाळू बोराडे,सतिष मुरकुटे,बंडू सोनवणे,राजेश काटे यांनी सकाळी ११ वाजता शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक भागिनाथ बांगर हे   पंढरपूरच्या वारीला गेल्याचे समजले. शिवाय इतर चार शिक्षकांनी त्यांच्या किरकोळ  रजा टाकल्या होत्या. एकूण १९ पैकी १२ शिक्षकच प्रत्यक्षात हजर होते.चार शिक्षकांच्या रजा होत्या. तर दोन शिक्षक प्रतिनियुक्तीवर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आहेत. यासंदर्भात पालकांनी सीईओ अमोल येडगे यांना सांगितल्या नंतर त्यांनी तत्काळ गटविकास अधिकारी आर.के. बागडे व गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांना शाळेवर जावून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले. 

नोटीस देणारमुख्याध्यापक भागीनाथ बांगर यांचा कसल्याही रजेचा अर्ज नसून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याची परस्पर रजा मान्य करू नये. पूर्वपरवानगीशिवाय जाऊ नये तसेच ज्यांना रजेवर जायचे आहे अशा शिक्षकांनी स्वत: अर्ज दाखल करावेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविणार असल्याचे गटविकास अधिकारी आर. के. बागडे यांनी सांगितले.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीTeacherशिक्षकBeedबीड