माजलगाव (जि. बीड): माजलगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी सत्ताधारी नगरसेवकांना उद्धटपणाची वागणूक दिल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित एका भूमिपूजन सोहळ्यात बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी अध्यक्षीय भाषणातून उपनगराध्यक्षांचे जाहीरपणे कान टोचले. "नगरसेवक आणि नागरिकांशी बोलताना आपली भाषा सुधारा," असा कडक सल्ला पोटभरे यांनी दिल्याने उपस्थित पाहुणे आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच शांतता पसरली होती.
नेमके काय घडले? नगरपालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार डी.के. देशमुख, माजी आमदार मोहनराव सोळंके आणि नगराध्यक्ष शिफा बिलाल चाऊस उपस्थित होते. उपनगराध्यक्ष सहाल चाऊस हे कामासाठी आलेल्या नगरसेवकांशी नीट बोलत नाहीत, तसेच फोन केल्यावर "फोन ठेव" असे म्हणत अपमान करतात, अशा तक्रारी नगरसेवकांनी लावून धरल्या होत्या. यावर "उपनगराध्यक्षांनी नगरसेवकांना फोनवर उद्धटपणे बोलणे योग्य नाही, त्यांनी आपली वागणूक बदलावी," अशा शब्दांत बाबुराव पोटभरे यांनी सहाल चाऊस यांना सुनावले. दरम्यान, या जाहीर टीकेमुळे माजलगाव नगरपालिकेतील सत्ताधारी गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी आमदारांची आजी आमदारांना 'कोपरखळी'तर याच कार्यक्रमात माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यपद्धतीवर मिश्किल टिप्पणी केली. "आमदारांना निधी आणण्यासोबतच राजीनाम्याची धमकी देऊन 'नाराजी नाट्य' घडवणे छान जमते," असे म्हणताच सभेत हशा पिकला.
Web Summary : Baburao Potbhare publicly reprimanded Majalgaon Deputy Mayor Sahal Chaus for his rude behavior towards councilors. Accusations included dismissive phone calls. Former MLA Mohanrao Solanke also subtly criticized current MLA Prakash Solanke, creating tension within the ruling party.
Web Summary : माजलगाँव के उप महापौर साहल चाऊस को पार्षदों के प्रति अभद्र व्यवहार के लिए बाबूराव पोटभरे ने सार्वजनिक रूप से फटकार लगाई। आरोपों में खारिज करने वाले फोन कॉल शामिल थे। पूर्व विधायक मोहनराव सोलंके ने भी वर्तमान विधायक प्रकाश सोलंके की आलोचना की, जिससे सत्तारूढ़ दल में तनाव पैदा हो गया।