शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात घुमला टाळ, मृदंगाचा गजर; बीडमध्ये युवकांच्या पुढाकाराने कीर्तन महोत्सवाचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:26 IST

कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी जिल्हा कारागृहात पहिल्यांदाच कीर्तन महोत्सव घेतला जात आहे.

ठळक मुद्देकारागृहात कैद्यांसाठी नेहमीच वेगवेगळे मनोरंजनात्मक व प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात. आतापर्यंत कारागृहात असा कार्यक्रम कोणीही अयोजित केला नसल्याचे सांगण्यात आले.

बीड : कैद्यांच्या मनपरिवर्तनासाठी जिल्हा कारागृहात पहिल्यांदाच कीर्तन महोत्सव घेतला जात आहे. आज दुपारी या महोत्सवास सुरूवात झाली. यावेळी टाळ, मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. तर कैद्यांच्या तोंडी विठ्ठल नामाचा गजर होता.

प्रा.नाना कदम व सुरेश जाधव या दोन युवकांच्या पुढाकारातून जिल्हा कारागृहात कीर्तन महोत्सव घेतला जात आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता या महोत्सवास सुरूवात झाली. यावेळी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, कारागृह अधीक्षक महादेव पवार, कारागृह निरीक्षक कांबळे, प्रा.नाना महाराज कदम, अभिमान महाराज ढाकणे, गणेश महाराज भांडे, गोरख महाराज वायभट, सचिन महाराज थापडे, प्रा.संभाजी जाधव, बाळू शिंदे, प्रकाश जाधव, दत्ता गव्हाने, ज्ञानोबा वायबसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कारागृहात कैद्यांसाठी नेहमीच वेगवेगळे मनोरंजनात्मक व प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात. त्यांचे मनपरिवर्तन करणे, हा या मागचा उद्देश असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारागृहातच सप्ताहाचे आयोजन सुरेश जाधव व  प्रा.नाना कदम यांनी केले. आतापर्यंत कारागृहात असा कार्यक्रम कोणीही अयोजित केला नसल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी सुरेश महाराज जाधव यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. एकदा केलेली चुक पुन्हा करू नका. एक चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करण्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी टाळकरी, कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व कैद्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :jailतुरुंगBeedबीडspiritualअध्यात्मिक