शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

By शिरीष शिंदे | Updated: May 8, 2023 18:24 IST

बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्था चालकांनी थकीत प्रतिपूर्तीचे कारण पुढे करत आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नाकारण्याचे धोरण स्वीकारले आहे.

बीड : राईट टू एज्युकेशन हा कायदा असतानाही बीड जिल्ह्यातील शाळा थकीत प्रतिपूर्तीचे कारण पुढे करत गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. शिक्षण हक्क अधिनियम कायद्याची पायमल्ली करणाऱ्या शाळा व संस्थाचालकांवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी घंटानाद आंदोलन केले.

बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्था चालकांनी थकीत प्रतिपूर्तीचे कारण पुढे करत आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नाकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. थकीत रक्कम मिळाल्याशिवाय प्रवेश न देण्याची भूमिका मेस्टा संघटनेने घेतली आहे. या अन्यायकारक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आरटीई मोफत प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात आरटीई अंतर्गत निकषपात्र २२५ शाळांनी नोंदणी केली होती. आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी या शाळांच्या पटसंख्येत एकूण १८२७ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. यासाठी ७९९६ ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. ५ मे रोजी पुणे येथे लॉटरी काढण्यात आली. पहिल्या फेरीतील प्रवेश तसेच प्रतीक्षा यादी जाहीर झाली. परंतु, प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती थकीत असल्याचे कारण देत संस्था चालकांनी आरटीई प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला असून, त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस, आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव, रामनाथ खोड, अनिता भोसले, किस्किंदा पांचाळ, शेख मुबीन, शेख मुस्ताक, राहुल कवठेकर, धनंजय सानप, भीमराव कुटे, आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनआरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. तसेच शासनाने प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती रक्कम संबंधित संस्थांना तत्काळ द्यावी, दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडRight To Educationशिक्षण हक्क कायदा