शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या दिल्या पण खोकल्याचे औषध दिले नाही, रूग्णाने डॉक्टरच्या कानशिलात लगावली

By सोमनाथ खताळ | Updated: March 9, 2024 16:23 IST

याप्रकरणी रूग्णाविरोधात गुन्हा दाखल; गेवराई उपजिल्हा रूग्णालयातील प्रकार

बीड : सर्दी, खोकल्याचा आजार झालेला रूग्ण उपचारासाठी आला. डॉक्टरांनी त्यास गोळ्या दिल्या. परंतू खाेकल्याचे औषध न दिल्याने संतापलेल्या रूग्णाने डॉक्टरच्या कानशिलात दोन चापटा मारल्या. हा प्रकार गेवराई उपजिल्हा रूग्णालयात ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता घडला. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकाराने डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेवराई उपजिल्हा रूग्णालयात शुक्रवारी डॉ.बालाजी नवले हे अपघात विभागात कर्तव्यावर होते. महाशिवरात्री असल्याने ओपीडी विभागात सुट्टी होती. त्यामुळे स्वप्नील जगन्नाथ मस्के (रा.गेवराई) हा सर्दी, खोकला झाल्याने उपचारासाठी आला. डॉ.नवले यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याला गोळ्याही दिल्या. परंतू समाधान न झाल्याने मस्के याने डॉक्टरांकडे खोकल्याच्या बाटलीची मागणी केली. डॉ.नवले यांनी ही बाटली अपघात विभागात उपलब्ध नाही. तोपर्यंत गोळ्या दिल्या असून उद्या सकाळी ओपीडीतून खोकल्याचे औषध घ्या, असा सल्ला दिला. हाच राग आल्याने मस्केने शिवीगाळ करत डॉक्टरच्या कानशिलात दोन चापटा मारल्या. त्यानंतर येथील ब्रदर महेंद्र भिसे, कक्षसेवक संतोष भोटकर आणि सुरक्षा रक्षक किशोर उबाळे यांनी त्याला पकडले. त्याला बाजूला केल्यानंतरही तो शिवीगाळ करत तेथून निघून गेला. त्यानंतर डॉ.नवले यांनी गेवराई पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून मस्केविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

चुक आरोग्य विभागाची अन् शिक्षा डॉक्टरांनाखरं तर औषधी, गोळ्या मुबलक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून सर्व सेवा, सुविधा, उपचार मोफत केले असून औषधीही देण्याचा निर्णय घेतला. परंतू आजही शासकीय रूग्णालयांमध्ये पूर्णपणे औषधी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. याचा फटका डॉक्टरांना बसत आहे. यावरून डॉ.नवले यांना रूग्णाने मारहाण केली आहे. परंतू यानिमित्ताने डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी