शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय; पत्नीचा गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:21 IST

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मनकॉट जिनींगमध्ये शनिवारी सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा ह. मु. माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमाजलगावमधील घटना : खून केल्यानंतर आरोपी पती ढाब्यावर दारु ढोसत होता; तासाभरात ठोकल्या बेड्या

माजलगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना माजलगाव शहरातील मनकॉट जिनींगमध्ये शनिवारी सकाळी घडली. उषा गणेश ढवळे (२२, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा ह. मु. माजलगााव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी पतीला पोलिसांना एका तासात बेड्या ठोकल्या आहेत.उषा व गणेश ढवळे हे दाम्पत्य कामगार आहे. दोन वर्षांपूर्वी ते कामासाठी माजलगावला आले होते. शहरातीलच एका जिनींगमध्ये दोघांनाही काम मिळाले. सुरूवातीचे काही दिवस सुखाने गेल्यानंतर पती गणेश हा उषाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे दोघांमध्ये अनेकवेळा कडाक्याचे भांडण झाले. मारहाण करण्याबरोबरच तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. याच संशयातून शुक्रवारी रात्रीही यातूनच त्यांच्यात वाद झाले. शनिवारी पहाटेच उठून गणेश दारू पिण्यासाठी गेला. सकाळी सहा वाजेच्या सुमारास तो परत आला आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाले. याचवेळी त्याने उषाचा गळा दाबला. यामध्ये जमिनीवर कोसळली यातच ती गतप्राण झाली. मात्र, ती जिवंत असल्याचे समजत तो दीड वर्षाच्या मुलाला घेऊन बाजूला राहणारा मेहुणा सुनील मोरे यांच्याकडे गेला. त्यांच्या घरी मुलाला ठेवून तो पसार झाला. मुलगा रडायला लागला आणि खूप वेळा झाला तरी त्याला घ्यायला कसे कोणीच आले नाही, म्हणून मोरे हे ढवळे यांच्या घरी गेले. यावेळी त्यांना उषा मयत झाल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा करीत माजलगाव शहर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान व त्यांच्या टिमने तात्काळ धाव घेतली. मोरेकडून माहिती घेत गणेशच्या मागावर पोलीस धावले.तासाभरातच शहराजवळीच एका धाब्यावर दारू पिताना त्याला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मेहुणा मोरे यांच्या फिर्यादीवरून गणेश ढवळे विरोधात माजलगाव शहर ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोनि सय्यद सुलेमान हे करीत आहेत.दारूच्या नशेत केला खूनगणेशला दारूचे व्यसन आहे. दिवसभर काम केल्यानंतर तो रात्रीच्यावेळी दारू प्यायचा. यामुळे उषा व गणेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद व्हायचे. शुक्रवारी रात्री किरकोळ वाद झालेला राग मनात धरून शनिवारी सकाळी गणेशने दारूच्या नशेत उषाचा काटा काढल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी