शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा 'सस्पेन्स'; दिग्गजांचे मुंबईत ठाण, इच्छुकांची वाढली धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 1:22 PM

Beed Shic Sena : माजी जिल्हा प्रमुखांसह इतर नवे पदाधिकारीही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तीन दिवस मुंबईत राहून शिवसेना भवन व इतर कार्यालयांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेतल्या.

बीड : कुंडलिक खांडे यांच्या शिवसेना (Shiv Sena ) जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळताच आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली. असे असले तरी शुक्रवारी रात्रीपर्यंत निवड न झाल्याने सस्पेन्स ( Suspense over Shiv Sena Beed district chief's) कामय आहे. तर इच्छुकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. तसेच पदाला स्थगिती मिळालेले खांडेदेखील गुरुवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी दुपारी शिवसेना भवनात दाखल झाले. तर दुसऱ्या बाजुला माजी मंत्री बदामराव पंडित व बांधकाम सभापती युद्धजित पंडित हे दोघे दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. या घडामोडींमुळे पक्षश्रेष्ठींपुढेही नवा पेच निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळाली होती. केज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची तक्रार झाल्यानेच त्यांच्या पदाला स्थगिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु स्थगिती मिळताच आता हे पद आपल्याला मिळावे, यासाठी माजी जिल्हा प्रमुखांसह इतर नवे पदाधिकारीही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तीन दिवस मुंबईत राहून शिवसेना भवन व इतर कार्यालयांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेतल्या. त्यांचा सत्कार करून एकाच बाकावर सर्व इच्छुक बसल्याचे फोटो देखील व्हायरल झाले. परंतु अद्यापही निवडीबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये विचार विनिमय सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीडमधून गेलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मनात धाकधूक कायम असल्याचे दिसते. आता हे पद कोणाला मिळणार, याकडे मात्र जिल्हावासीयांसह राजकीय कार्यकर्ते, नेत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

 

पक्षश्रेष्ठींपुढे एकमेकांवर टिकेचे 'बाण'

बीडमधून जेवढे इच्छुक गेले त्या सर्वांनी शिवसेना सचिव अनिल देसाई, संपर्क प्रमुख आनंद जाधव, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूळकर यांच्या भेटी घेतल्या. यावेळी पक्षसंघटन वाढविण्याबाबत कोणीच जास्त बोलले नाहीत. केवळ एकमेकांविरोधात आरोप केले. आगामी निवडणुकांबाबतही कोणीच काही बोलले नाही. केवळ पद आपल्याला कसे मिळेल, यातच सर्वांची चढाओढ असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षश्रेष्ठींनीही इच्छुकांच्या कामाचा 'लेखाजोखा' मागितल्याचे सूत्रांकडून समजते.

---खांडेंनी लावली पूर्ण ताकद

पदाला स्थगिती मिळालेले कुंडलिक खांडे यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. पत्रकार परिषद घेऊन आपल्याला यात गोवल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी प्रस्थापितांवरही आरोप केले होते. दरम्यान, परिषद पार पडताच खांडे यांनी मुंबई गाठली. शुक्रवारी दुपारी शिवसेना भवनात जावून पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. आपले पद कायम ठेवण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीड