शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ८२ स्वस्त धान्य दुकाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:50 IST

बीड : स्वस्त धान्य दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ८२ दुकानदारांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी आॅनलाईन धान्य वितरीत केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.स्वस्त धान्य दुकानांमधील काळाबाजार रोखण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांकडून याची ...

बीड : स्वस्त धान्य दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ८२ दुकानदारांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी आॅनलाईन धान्य वितरीत केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

स्वस्त धान्य दुकानांमधील काळाबाजार रोखण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे ३० टक्क्यांपेक्षा अधिक धान्य वितरीत करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी ए. टी. झिरवाळ यांनी दिले होते. तसेच आॅनलाईन वितरण कमी असणाऱ्या ५२१ धान्य दुकानदारांना नोटीस देखील बजावली होती. मात्र त्यानंतर देखील काही दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आॅनलाईन वितरण केले नाही.

शासनाच्या आदेशानंतर देखील एप्रिल व मे महिन्यात आॅनलाईन धान्य वितरण १५ टक्क्यांपेक्षा कमी केल्यामुळे जिल्ह्यातील ८२ दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानांवरील निलंबन रोखण्यासाठी राजकीय क्षेत्रातून दबाव आणला जात आहे.

निलंबन रोखता येईलएप्रिल आणि मे महिन्यात ई-पॉस मशीनद्वारे १५ टक्क्यांपेक्षा कमी धान्य वितरीत केलेल्या दुकांनावर ही कारवाई करण्यात आली आहे. या दुकानदारांनी जर जून महिन्यात आॅनलाईन धान्य वितरण केले तर निलंबनाची कारवाई रोखता येईल.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाgovernment schemeसरकारी योजना