शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत मुरूम उत्खनन प्रकरणी सुशील सोळंकेंना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:11 IST

शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली.

ठळक मुद्देदहा लाखांच्या दंडाची नोटीस : तहसीलदार प्रतिभा गोरे यांची कारवाई

माजलगाव : शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, सर्व्हे नं. ३८० मध्ये शासकीय गायरान आहे. शिवाजी चौकापासून सार्वजनिक बांधकाम रोड, बीड रोड, शतायुषी हॉस्पिटल व परिसरात ५१ लोकांनी अतिक्र मण करून शासकीय जमीन बळकावली आहे. सदरील अतिक्र मण धारकांनी सर्व्हे नं. ३६८ मधील खरेदीखत असले तरी प्रत्यक्षात ताबा मात्र महसूल प्रशासनाच्या सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरानावर घेतल्याचे उघड झाल्याने संबंधित अतिक्र मणधारकांची गाव नमुना नं. १ ई. या अतिक्र मण नोंद वहीत नोंदी करण्यात येवून अतिक्र मण सिध्द करण्यात आले. त्यांचाच भाग म्हणून गोकुळधाम इमारतीची काही जागा अतिक्र मण सिद्ध झालेली आहे. त्याच लगत शासनाच्या जागेत गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोट्यवधीच्या जागेत डॉ.सुशील बन्सीधरराव सोळंके यांनी शासकीय जागेवर बांधकामाच्या उद्देशाने अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन सुरू ठेवले होते. ही बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर मंडळ अधिकारी याच्या अहवालाआधारे सदरील खोदकामाचे मोजमाप करून ३०३ ब्रास मुरूमाचे समोर आले. त्यानूसार प्रती ब्रास ६०५ रूपये रॉयल्टी प्रमाणे १ लाख ८३ हजार ३१५ रूपये प्रमाणे या रक्कमेच्या पाचपट दंडासह १० लाख ९९ हजार ८९० रूपये दंडाची नोटीस डॉ.सुशील बन्सीधरराव सोळंके यांना तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी बजावत तीन दिवसांत याबाबत खुलासा करण्याचे सुचवले आहे.

टॅग्स :BeedबीडTahasildarतहसीलदारRevenue Departmentमहसूल विभाग