शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीशिवाय औषधी विकणे भोवले; विकतात अनेकजण, सापडले केवळ २५ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात मेडिकल चालकांकडे औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. तर नागरिकांनीही कोरोना चाचणीच्या भीतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात मेडिकल चालकांकडे औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. तर नागरिकांनीही कोरोना चाचणीच्या भीतीने आजार सांगून मेडिकलमधून औषधी नेली. याबाबतच्या प्राप्त तक्रारी आणि तपासणीत काही लोक दोषी आढळले. मागील वर्षभरात अशा ५ मेडिकलचे परवाने कायमचे रद्द केले तर २० मेडिकलचे तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जवळपास दीड हजार मेडिकल परवाने आहेत. अनेक मेडिकलवर औषध निर्माता नसतात. तर काही ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देऊ नये, असा नियम आहे. परंतु मेडिकल चालकांकडून याचे उल्लंघन होत आहे. आतापर्यंत अशा २५ जणांवर कारवाया झाल्या आहेत.

कोरोकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?

n कोरोनाकाळात अनेकांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे जाणवत होती.

n परंतु डॉक्टरकडे गेल्यावर लगेच कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात होता.

n त्यामुळे काही लोकांनी डॉक्टरांकडे जाणेच टाळल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळाली.

n म्हणून चिठ्ठीशिवाय औषधे घेतली.

बहुतांश ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी

बार्शी रोड, बीड

शहरातील बार्शी रोडवर जिल्हा रुग्णालय आहे. याच रुग्णालयाबाहेर मेडिकल थाटलेली आहेत. या ठिकाणी सर्रासपणे चिठ्ठीशिवाय औषधी दिल्याचे दिसतात. चालकांकडून नागरिकांना आजार विचारून घेत औषधी दिली जातात. याची तपासणी करण्यास औषध प्रशासनाकडे वेळच नाही.

बसस्थानकामागे, बीड

बीड बसस्थानकाच्या मागे डॉक्टरलाईन आहे. येथे सर्वत्र खासगी रुग्णालये व मेडिकल आहेत. तसेच सुभाष रोड, जालना रोड, नगर रोड भागातही रुग्णालयाविना स्वतंत्र असे मेडिकल आहेत. येथे सर्रासपणे आजार विचारून औषधी दिली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

औषधी प्रशासन म्हणते....

कोरोनाकाळात चिठ्ठीशिवाय औषधी दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची तपासणी आमच्याकडून करण्यात आली. ज्या ठिकाणी थोड्या त्रुटी दिसल्या तेथील परवाने निलंबित करण्यात आले. तर जेथे जास्त होत्या, त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला.

रामेश्वर डोईफोडे,- औषध निरीक्षक, बीड

---

वर्षभरात झालेल्या कारवाया

कायमचा परवाना रद्द- ५

परवाने निलंबित- २०