शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यातील सहा आरोपींचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 18:34 IST

आतापर्यंत केवळ एकाच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते

ठळक मुद्दे दोन वर्षांपासून होते फरार दोन दिवसांची पोलीस कोठडी

बीड : दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हरभरा आणि तूर घोटाळ्यातील सहा आरोपींनी २३ ऑगस्ट रोजी आर्थिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले. अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गणेश अनिरुध्द चोरमले (३८, खरेदी केंद्रप्रमुख वडवणी), मुंजाबा रामभाऊ मैंद (३९ , ऑपरेटर रा. चिंचाळा, ता. वडवणी), जावेद चांदसाहब बागवान (४०, खरेदी केंद्रप्रमुख बीड व गेवराई), गोविंद व्यंकटी दौंड (४२, केंद्रप्रमुख परळी), राजाराम रंगनाथ काजगुंडे (३९ ,ऑपरेटर रा. अस्वलअंबा ता. परळी), श्रीराम अच्युतराव शिंदे (३७, ऑपरेटर, रा. रामेश्वर ता.गेवराई) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यात धान्य खरेदीत मोठी अफरातफर झाली होती. जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेने मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली होती. यात कोट्यवधींचा घोटाळा झाला होता. शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर मार्केटिंग फेडरेशनकडून रक्कम उचलण्यात आली. मात्र, फेडरेशनला सदर माल दिलाच नाही. या प्रकरणात एप्रिल २०१९ मध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे संचालक, केंद्रप्रमुख, ऑपरेटर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

केवळ एकाच आरोपीला पकडण्यात यशआतापर्यंत केवळ चाँदसाहेब हसनभाई बागवान या एकाच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते, तर इतर आरोपी फरार होते. २३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सहा फरार आरोपी स्वत:हून आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले. त्यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली.....

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार