शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 19:57 IST

पाऊण लाखांवर मताधिक्य घेत धोंडे, आजबे, शेख यांना रोखले

- अविनाश कदमआष्टी : विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेबूब शेख यांच्यात चौरंगी लढत होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, सुरेश धस यांना जनतेने मोठे मताधिक्य दिल्याने ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसून आले. सुरेश धस यांनी १ लाख ४० हजार ५०७ मते घेत भीमराव धोंडे, महेबूब शेख, बाळासाहेब आजबे यांचा पराभव केला.

येथील आयटीआयमध्ये २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम झालेल्या पोस्टल मतमोजणीत २४३ मतांनी धस पुढे होते. त्यानंतर यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत १,८७९ मतांपासून शेवटच्या ३२व्या फेरीपर्यंत ७७ हजार ९७५ मतांची आघाडी घेऊन धस यांनी दणदणीत विजय मिळविला. सुरेश धस यांनी मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. एक वेळा विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली.

सुरेश धस यांच्या विजयाची कारणे१) धोंडे, आजबे, शेख तिघे विरोधात असल्याने जनतेची मिळालेली सहानुभूती.२) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच सरकारच्या विविध योजनांमुळे जनतेचा कौल.३) निवडणूक प्रचाराचे नियोजन आणि गावागावातील कार्यकर्त्यांनी जोमाने केलेले काम.४) धस कुटुंबातील देविदास धस, प्राजक्ता धस, जयदत्त धस, श्याम धस, सागर धस हे मतदारसंघात प्रचाराच्या मैदानात उतरले होते.

भीमराव धोंडे यांच्या पराभवाची कारणे१) सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सामील न होणे.२) व्यक्तीगत जनतेची कामे करण्यात कमी पडले. जुन्या - नव्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्यात अपयश.३) जातीयवादाचा फटका बसला, कार्यकर्ते व नियोजन असणाऱ्यांचा कारभार नडला.४) ओबीसी मतांची विभागणी झाल्याने एकगठ्ठा मतदान झाले नाही.

मतमोजणीच्या ठिकाणी घडामोडीसकाळी आठ वाजेपासून १४ टेबलवर ३२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. संरक्षणासाठी अपर पोलिस अधीक्षकांसह पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात होते. मतमोजणी प्रक्रियेसाठी ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी वसीमा शेख यांनी विजयी उमेदवार सुरेश धस यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ashti-acआष्टीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSuresh Dhasसुरेश धस