शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून संसार उद्ध्वस्त; पत्नीने विषारी द्रव्य प्राशन करून तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 15:17 IST

दोघांच्याही नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली आहे.

ठळक मुद्देपत्नीने केली विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या पत्नीच्या मृत्यूनंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

परळी - तालुक्यातील पांगरी कॅम्प येथे नवविवाहितेचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाला. तर यानंतर काही तासात तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. प्रियंका सायस पंडित (वय 19.) आणि सायस पंडित (25 ) अशी मृत पती -पत्नीचे नाव आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पांगरी कॅम्प येथे राहणाऱ्या प्रियंका व सायस यांचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. मंगळवारी दोघांत कौटुंबिक कारणाने वाद झाला. त्यातूनच प्रियंकाने सायंकाळी सहाच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. तिला लागलीच उपचारासाठी परळीच्या रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. यानंतर रात्री अकराच्या सुमारास सायस याने पांगरी कॅम्प येथील एका घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी परळीतील उपजिल्हारुग्णालय आणण्यात आले आहेत. दरम्यान, दोघांच्याही नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. ग्रामीण पोलीस निरीक्षक शिवलाल पूर्भे यांनी पांगरी कॅम्प येथील घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडFamilyपरिवार