शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सासूच्या जाचास कंटाळून जावयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:22 IST

सासूसह पत्नीच्या त्रासास कंटाळून जावायाने लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सारुळ येथे रविवारी घडली. दरम्यान आत्महत्या केलेल्या जावयाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देकेज तालुक्यातील सारुळ येथील घटना : मयताच्या खिशातील चिठ्ठीमुळे खुलासा; पत्नी, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

केज : सासूसह पत्नीच्या त्रासास कंटाळून जावायाने लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सारुळ येथे रविवारी घडली. दरम्यान आत्महत्या केलेल्या जावयाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी केज पोलिसात सासूसह पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील सारुळ येथील राजुद्दीन मैनुद्दिन सय्यद हा गावीच स्वत:च्या शेतात काम करत होता. त्यास त्याची सासू व पत्नी यांनी गावी काम करण्याऐवजी शहरात जाऊन काम करण्यासाठी तगादा लावला. तो कामासाठी केज येथे वास्तव्यास राहिला. तरीही सासू व पत्नीने राजुद्दीन यास लातूर या माहेरी कामासाठी चला असा तगादा लावत अपमानास्पद वागणूक देण्यास चालू केले. लातूर येथे न आल्यास त्याच्या मुलासह लातूर येथे घेऊन जाण्याची धमकी देत मारहाण करत त्याच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याची धमकी देत असत.दरम्यान, रविवार १७ फेब्रुवारी रोजी राजुद्दीन सय्यद यांने सारु ळ येथे स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आली. ही माहिती मिळाल्यानंतर केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्या दरम्यान राजुद्दीनच्या पँटच्या खिशात त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीत राजुद्दीन याने पत्नी व सासू यांनी मला व माझ्या कुटुंबाला खुप त्रास दिल्याचे नमूद केले आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूस त्याची सासू व पत्नी हेच कारणीभूत असल्याची तक्रार मयताचे वडील मैनुद्दीन सय्यद यांनी केज पोलिसांत दिल्याने सासूसह पत्नीच्या विरोधात केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी तपास फौजदार सुरेश माळी व जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत. मयत राजुद्दीन सय्यद याच्या पश्चात दोन मुले तसेच आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी