शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गर्भपात प्रकरणात सुदाम मुंडेसह तिघांना १० वर्षांची शिक्षा; जामिनावर तिघेही बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:54 IST

डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करीत असे. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते.

ठळक मुद्दे जामिनावर बाहेर येताच सुदाम मुंडे याने पुन्हा दुकान थाटले२०१० ते २०१२ या कालावधीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्भपात

बीड : गर्भपात करताना एका ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी सुदाम मुंडे, त्याची पत्नी सरस्वती आणि  मृत महिलेच्या पतीला गेल्यावर्षी जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  जामिनावर बाहेर येताच सुदाम मुंडे याने पुन्हा मुलीच्या रुग्णालयात आपले दुकान सुरू केले आणि तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.  

२०१० ते २०१२ या कालावधीत त्याच्या रुग्णालयात तब्बल तीन हजार ९४० गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या विक्रीडिल या औषधींचा वापर झाला होता. आरोग्य विभागाने केवळ १० खाटांची परवानगी दिली असताना ६४ खोल्यांत तब्बल ११७ खाटा होत्या. परळीतील उच्चशिक्षित असलेला सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदविधारक होता.  या दाम्पत्याचा वैद्यकीय व्यवसायही जोरात होता. मात्र मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दाम्पत्याने आरोग्य पेशाला काळीमा फासायला सुरवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले. परळीतील मोजक्या आर्थिक सक्षम व्यक्तींपैकी एक असल्याने त्याची राजकीय उठबसही होतीच. याचाच गैरफायदा घेत त्याने महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा आविर्भाव आणला. डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करीत असे. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते.

 

महिलेचा गर्भपात करताना मृत्यू सुदाम मुंडेने १८ मे २०१२ रोजी विजयमाला महादेव पटेकर (रा. भोपा, ता. धारूर) या ऊसतोड मजूर महिलेचा बेकायदा गर्भपात केला. यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्शन ३अ, सेक्शन ९, सेक्शन १७, सेक्शन २९  नुसार गुन्ह्याची नोंद झाली होती. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन ४ आणि ६ चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला होता.  

१७ आरोपी या प्रकरणामध्ये होते१७ आरोपींमधील जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. याप्रकरणी उर्वरित ११ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. २०१९ साली याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली होती.  सहा महिन्यांपूर्वी या तिघांनाही सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. 

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर