शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाराती’त पुन्हा यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:25 IST

येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात पुन्हा एकदा ५० वर्षीय रुग्ण महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार पीळ पडलेला साडेतीन किलो वजनाचा अंडाशयाचा गोळा काढून महिलेचे प्राण वाचवण्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या पथकाला यश मिळाले आहे.

ठळक मुद्देचार पीळ पडलेल्या साडेतीन किलोचा अंडाशयाचा गोळा काढला बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात पुन्हा एकदा ५० वर्षीय रुग्ण महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार पीळ पडलेला साडेतीन किलो वजनाचा अंडाशयाचा गोळा काढून महिलेचे प्राण वाचवण्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या पथकाला यश मिळाले आहे.गंगाखेड तालुक्यातील पुसद येथील ५० वर्षीय महिला पोटदुखीच्या आजारामुळे त्रस्त होती. मात्र, घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्या महिलेस खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अशक्य होते. ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागात उपचारासाठी आली होती. गंगाखेड येथे सोनोग्राफी केल्यानंतर सदरील महिलेस पोटात अंडाशयाचा गोळा असल्याचे निष्पन्न झाले होते. डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेस भरती करून यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिये दरम्यान ३.५ किलोचा अंडाशयाचा गोळा काढण्यात आला. सदरील गोळ्याच्या देठाला चार पीळ बसले होते.ते सरळ करून गोळा काढण्यात आला. दुसऱ्या अंडाशयाला गाठी असल्यामुळे ते अंडाशय तसेच गर्भपिशवीही काढण्यात आली. सदरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा जीव वाचला.शस्त्रक्रियेनंतर महिला सुटीसाठी आग्रह धरत होती. डॉ. बनसोडे यांनी महिलेच्या शस्त्रक्रियेचे विरघळवण्याचे टाके दिल्यामुळे महिलेचे आरोग्य पूर्ववत झाले. त्या महिलेस सहाव्या दिवशी सुटी देण्यात आली.या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. संजय बनसोडे यांना डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. प्रवीण राजपूत, डॉ. वर्षा वरपे, डॉ. ज्योती डावळे, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. अर्चना पारसेवार, डॉ. अभिजित पाटील, डॉ. प्रियांक दासीला, डॉ. पुष्पदंत रुग्गे यांचे सहकार्य लाभले. डॉ. गणेश निकम, डॉ. प्रसाद मुळे, डॉ. निकिता यांनी भुलतज्ज्ञाचे कार्य पाहिले.सदरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण केल्याबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, इएनटी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे व इतरांनी स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सर्व पथकाचे स्वागत केले आहे.६ महिन्यात ६० शस्त्रक्रियामागील सहा महिन्यात स्त्रीरोग विभागात गर्भाशय, अंडाशय, गर्भनलिकेच्या विविध आकाराच्या व वजनाच्या एकूण ६० शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. यापूर्वी स्त्रीरोग विभागात १० किलोपर्यंतच्या गोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईhospitalहॉस्पिटल