शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जयदत्त क्षीरसागरांच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:55 IST

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांत समाधान : ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर

बीड : राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईट आणि परिसरातील गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ईट येथे आरोग्य उपकेंद्र गरजेचे होते. या भागातील ग्रामस्थांच्या आग्रहावरून क्षीरसागर यांनी हे केंद्र मंजूर केल्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे.ईट आणि परिसरातील ७ ते ८ खेडेगावात ग्रामस्थांना आरोग्य सुविधेसाठी पिंपळनेर आणि बीड या ठिकाणी यावे लागत होते. ईट या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी मागणी या भागातून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. मंत्री क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ईट या ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे. या उपकेंद्रामुळे ईटसह जवळपासच्या गावांना आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचबरोबर चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दर्जा उन्नतीकरण करून चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय करावे, असा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ईट या ठिकाणी उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून क्षीरसागर यांच्या माध्यमातून या मागणीसह अनेक मागण्या मंजूर करून घेणार असल्याचे गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे यांनी सांगितले आहे.मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लोकनेते असून त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. सत्ताधारी पक्षात आल्यामुळे बीड विधानसभा मतदार संघातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लागत असल्याची चर्चा मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे.ईट येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत होती. वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले होते. इतरत्र उपचारासाठी घेऊन जाणे अधिक खर्चाचे होते.बीड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कृती आराखडा बनविला आहे. यापूर्वी विरोधी पक्षात असल्यामुळे विकास कामे करताना, निधी खेचून आणताना अडचणी येत होत्या. आता सत्ताधारी पक्षात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून आणला आहे.- जयदत्त क्षीरसागर, रोहयो व फलोत्पादन मंत्री

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरhospitalहॉस्पिटल