शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तलाठ्यासह पत्नीला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:08 IST

ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याप्रकरणी तलाठी मधुकर संभाजी वाघमारे यास ३ वर्षे सक्तमजुरी तसेच १ लाख रुपये दंड व त्याची पत्नी मंगल मधुकर वाघमारे हिस १ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजु शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली चौकशी : पत्नीला ५० हजार दंड, १ वर्षे सक्तमजुरी

बीड: ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याप्रकरणी तलाठी मधुकर संभाजी वाघमारे यास ३ वर्षे सक्तमजुरी तसेच १ लाख रुपये दंड व त्याची पत्नी मंगल मधुकर वाघमारे हिस १ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजु शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.तलाठी मधुकर संभाजी वाघमारे हा गेवराई तालुक्यात तलाठी पदावर असताना त्याने अवैधरित्या अमाप संपत्ती स्वत: व पत्नीच्या नावे जमा केल्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची उघड चौकशी केली.तलाठी वाघमारे व त्याची पत्नी मंगल यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात २००५ मध्ये लाचलुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गौतम देशमुख यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर सिटीकर यांनी २००९ मध्ये तलाठी वाघमारे व त्याची पत्नी मंगल यांच्याविरुद्ध ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याप्रकरणी बीड येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने १९ तर बचाव पक्षाने २ साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यावरुन व सरकार पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजू शेंडे यांनी तलाठी वाघमारे व त्याची पत्नी मंगल यांना उपरोक्त शिक्षा सुनावली. तसेच त्यांनी जमवलेली अवैध मालमत्ता अपील काळानंतर जप्त करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. त्यांना निवृत्त पोलीस बनसोडे, पोलीस शिपाई गरडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय