शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे बंद; बीड शहर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणे आडमुठे धोरण आवलंबत नगर पालिकेने थकबाकी न भरल्यामुळे पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री पूर्ण बीड शहर अंधारात होते. नगर पालिका आणि महावितरणाच्या थकबाकीच्या वादात बीडकरांना वेठीस धरले जात असून अंधाराचा फायदा घेत, अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणे आडमुठे धोरण आवलंबत नगर पालिकेने थकबाकी न भरल्यामुळे पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री पूर्ण बीड शहर अंधारात होते. नगर पालिका आणि महावितरणाच्या थकबाकीच्या वादात बीडकरांना वेठीस धरले जात असून अंधाराचा फायदा घेत, अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शहरातील पथदिव्यांची वीज जोडून बीडकरांचा हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मागील काही दिवसांपासून बीड शहरात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच काळजी घेण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन केले जात आहे. एकीकडे चोºयांवर नियंत्रण मिळवून चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असताना दुसºया बाजुला मात्र महावितरणने पथदिव्यांची वीज जोडणी तोडून चोरट्यांना एकप्रकारे पाठबळ दिल्याची चर्चा सुरू आहे. महावितरणच्या या आडमुठेपणाबद्दल सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वर्षभर वीज बील थकबाकीकडे दुर्लक्ष करणाºया महावितरणला आर्थिक वर्ष संपत आली की अचाकन जाग आली आहे. आपला गलथान कारभार आॅडीच्या माध्यमातून चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी त्यांचा हा खटाटोप असल्याचे दिसून येत आहे. पथदिवे कनेक्शन तोडून बीडकरांचे हाल करण्यापेक्षा थकबाकी भरत नाही, म्हणून सर्वसामान्यांप्रमाणे नगर पालिकेवरच थेट कारवाई का करत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.पालिकाही उदासिननगर पालिकेची थकबाकी वसुल करण्यासाठी पालिकेने पथके नियूक्त केली आहेत. परंतु आपल्याकडे थकबाकी भरण्यास पालिका उदासिन असल्याचे दिसून येते. पालिकेच्या गलथान कारभारामुळेच बीडकरांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. थकबाकी भरण्याची मागणी आहे.पालिकेकडे किती थकबाकी आहे, याचा नक्की आकडा सांगता येणार नाही. त्यांच्याकडे थकबाकी असल्यसानेच पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे.-विनय घनबहाद्दूरअतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, बीड