कडा : आष्टी तालुक्यातील टाकळसिंग मंडळातील पाच सहा गावांना बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, तूर, कापूस पिके जमीनदोस्त झाली. या ठिकाणी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.आष्टी तालुक्यातील टाकळसिंग, खडकत, पारगाव, हिंगणी, चिखली परिसरातील पिके भुईसपाट झाली. तसेच पारगाव जोगेश्वरी, हिंगणी येथील १२ ते १३ घरांवरील पत्रे उडाले. काही घरांची पडझड झाली.याबाबत टाकळिसंग सज्जाचे मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगणवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, येथील नुकसान झालेल्या पिकांचे व घर पडझडीचे पंचनामे तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत.मदतीचे आश्वासनआष्टी : खडकत, हिगणी, पारगाव, वाळूज, जामगाव, सागवी येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रभाकर अनंत्रे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ जगताप, मंडळ कृषी अधिकारी गोरख तरटे, सरपंच रामदास उदमले,कांतीलाल जोगदध,दत्ता जेवे, ग्रामसेवक नवनाथ लोंढे, विष्णू पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन सरकारतर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
वादळी पावसाचा तडाखा, पिके जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:34 IST
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग मंडळातील पाच सहा गावांना बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, तूर, कापूस पिके जमीनदोस्त झाली. या ठिकाणी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
वादळी पावसाचा तडाखा, पिके जमीनदोस्त
ठळक मुद्देअनेक घरांची पडझड, पत्रे उडाले : नुकसान भरपाईची मागणी