शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वडवणीत कडकडीत बंद, दोन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:44 IST

ब्रह्मनाथ तांडा येथील सोळा वर्षीय स्वाती गोविंद राठोड आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी पुकारलेल्या वडवणी बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील सोळा वर्षीय स्वाती गोविंद राठोड आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी पुकारलेल्या वडवणी बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर बीड परळी हायवेवर शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.इयत्ता नववीत शिकणाऱ्या स्वाती राठोड हिने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी अमर तिडके व हनुमंत सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींना अटक करण्यासाठी रविवारी तालखेड फाटा येथे रोस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर सोमवारी वडवणी बंद आणि रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. स्वाती आत्महत्येप्रकरणी कडकडीत बंद पाळण्यात आला.बीड - परळी मार्गावर शिवाजी महाराज चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी जिल्हाभरातून समाज बांधव बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाले. सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी झाली. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पीडित कुटुंबाला भेटण्यास महिला व बालविकास मंत्र्यांकडे वेळ नसल्याची टीका करुन शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने २५ लाखांची मदत करण्याची मागणी केली.यावेळी मोहनराव जगताप, प्रा. पी. टी. चव्हाण, जि. प. सदस्य औदुंबर सावंत, शरद चव्हाण, संपत चव्हाण, अ‍ॅड. संगीता चव्हाण, विनायक मुळे, दिनेश मस्के, बजरंग साबळे, दादासाहेब मुंडे, बी. एम. पवार, संतोष पवार, विलास राठोडसह जिल्हाभरातुन महिला, मुली, विद्यार्थी, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तब्बल दोन तासानंतर तहसीलदार प्रभाकर खिल्लारे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन पीडित कुटुंबातील आई वडील आणि विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले. उपविभागीय पोलीस आधिकारी भास्कर सावंत, पो.नि. सुरेश खाडे, पो. उप नि. ए. एस. सिद्दीकी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाने बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :agitationआंदोलनcommunityसमाजSuicideआत्महत्या