बसची गती आणि लोकेशनही कळणार
प्रवासादरम्यान ब्रेकडाऊन होणाऱ्या बस शोधणे सुलभ होणार आहे. बस कुठे व का उभी आहे, तसेच बसची गती किती आहे, ओव्हर स्पीड आहे का, याची माहिती या प्रणालीअंतर्गत अधिकाऱ्यांना बसल्या जागी मिळणार आहे. त्यामुळे लागणाऱ्या गरजेची पूर्तता करणे सुलभ होणार आहे.
बस स्थानकात लागले मोठे स्क्रीन
रापमच्या बीड विभागात आठ मोठे बस स्थानक आहेत. प्रत्येक बस स्थानकावर ४२ इंची स्क्रीन लावण्यात आले असून पॅसेंजर इन्फॉरमेशन सिस्टीमद्वारे प्रवाशांना ते प्रतीक्षा करीत असलेल्या बसची माहिती कळू शकणार आहे. या स्क्रीनवर प्रत्येक गाडी सध्या कुठल्या ठिकाणी आहे, स्थानकात पोहोचण्यास किती वेळ लागेल, याची माहिती मिळणार आहे.
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
बस विनाकारण लेट होत असेल, वाहक-चालकाकडून कोठे टाइमपास केला जात असेल, तर लगेच कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. गाड्यांना वेळ पाळणेही सोपे होईल. तसेच बसची ओव्हरस्पीड संबंधित निरीक्षकांना या प्रणालीतून समजणार असल्याने चालकांनाही अनुपालन करावे लागणार आहे.
-------
प्रवाशांना ॲपवर कळणार सर्व माहिती
रापमच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ॲप विकसित होत आहे. याद्वारे प्रवाशाला कोठून कोठे जायचे यासाठी त्या मार्गावरून काेणती बस कधी जाणार, बसचे चालक, वाहकांचे मोबाइल क्रमांक, बॅच नंबर आदी लोकेशन मायक्रो मॅपप्रमाणे उपलब्ध होणार आहे.
---------
व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीममुळे प्रवाशांना बस ट्रॅक करता येणार आहे. त्यावरून किती वेळ लागणार हे समजू शकेल. प्रवासाचे नियोजन करता येईल. तासनतास ताटकळत थांबायची गरज पडणार नाही. या प्रणालीमुळे प्रवाशांना सुविधा होणार आहे.
-संदीप पडवळ, विभागीय वाहतूक अधिकारी, बीड.
---------