शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:16 IST

जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली मंजुरी : ४८८ हंगामी वसतिगृहांना दोन दिवसात मिळणार ८ कोटी ७९ लाखांचे अग्रीम

बीड : जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी अग्रीम रक्कम अदा करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी मंजुरी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान हंगामी वसतिगृहांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात आल्याचे या मंजुरीवरुन स्पष्ट होत आहे.बीड जिल्ह्यात समग्र शिक्षा अभियानंतर्गत यंदा शिरुर कासार तालुका वगळता दहा तालुक्यांत हंगामी वसतिगृहांना मंजुरी मिळाली होती. शिरुर तालुक्यात डीबीटीनुसार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. जिल्ह्यात १ डिसेंबरपासून वसतगिृहांना मंजुरी देण्यात आली होती.वसतिगृहातील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी बायोमेट्रीकद्वारे उपस्थिती बंधनकारक होती. १२ जानेवारी रोजी एकाच दिवशी वसतगिृहांची तपासणी करण्यात आली होती. यात जवळपास ३ हजार विद्यार्थी अनुपस्थित आढळले होते. तपासणीतील उपस्थिती अहवालानुसार बिले काढणार असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच बजावलेले आहे. या नंतर राज्याच्या पथकाने तीन दिवसात विविध ठिकाणच्या हंगामी वसतिगृहांची तपासणी केली होती. हंगामी वसतिगृहांना अग्रीम मिळावे अशी मागणीही पुढे येत होती.समग्र शिक्षा विभागाच्या वतीने १२ जानेवारीच्या विद्यार्थी उपस्थिती तपासणीचा अहवाल आणि अग्रीम बिल अदा करण्याबाबत प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केला होता. त्यानुसार मंगळवारी ८ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.बायोमेट्रीक यंत्राची अचानक तपासणीबीड जिल्ह्यात दोन टप्प्यात ५९० हंगामी वसतिगृहांना मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात किती वसतिगृह सुरु झाले याचा तपासणी अहवाल आला. या अहवालानुसार ४८८ हंगामी वसतिगृहांना अग्रीम रक्कम विद्यार्थी उपस्थितीनुसार मिळणार आहे.जानेवारीमध्ये राज्यस्तरीय पथकाने पाहणी केली असता बीड, वडवणी, गेवराई आणि आष्टी भागातील वसतिगृहांचे बायोमेट्रीक मॅन्युप्लेट असल्याचे दिसून आले. त्यामुळे बायोमेट्रीक यंत्राची तपासणी अचानक केली जाणार आहे.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र