शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव नगर परिषदेकडून रहिवाशांच्या डोक्यात धोंडा; कराच्या अव्वाच्या सव्वा नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 16:11 IST

या नोटीसामध्ये अनेक त्रुटी आहेत. पत्राच्या घरांना जादा कर तर स्लॅब असलेल्या घरांना कमी कर लावल्याचे आढळून आले आहे

ठळक मुद्देमनमानी कर लावण्यात आले असतांना नागरिक नगरसेवकांना याबाबत विचारणा करत आहेत.परंतु नगरसेवक याविरोधात काहीच बोलायला तयार नाहीत.

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील नगर परिषदेकडून शहरातील जवळपास 14 हजार मालमत्ताधारकांना आपल्या घराचे  मूल्यांकनानुसार वार्षिक भाडे मूल्य व कर आकारणीच्या अव्वाच्या सव्वा रुपयांच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नगरपालिकेच्या कुठल्याही शाळा सुरू नसतांना शिक्षण कर, शहरात वृक्षारोपण नसतांना वृक्ष कर, रोजगार कर असे मनमानी पद्धतीने कर नागरिकांच्या माथी मारले असून नगरपालिकेने करापोटी एकप्रकारे जनतेच्या डोक्यात धोंडाच घातल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

१९७२ पासून माजलगाव नगरपरिषदेच्या हद्दी अंतर्गत असलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण  करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे 2017 साली अमरावती येथील कोअर प्रोजेक्ट या खाजगी कंपनीच्यामाध्यमातून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एकूण १३ हजार ७४९  मालमत्ता असल्याची नोंद आहे. या कंपनीच्यावतीने मूल्यांकनाचे काम ऑनलाईन पीटीआर पद्धत पूर्ण करण्यात आले आहे. त्याप्रमाणे  शहरातीलवरील १३ हजार ७४९ मालमत्ताधारकांना नोटीसा वाटप करण्यात येत आहेत.  प्रतिमाह दर स्क्वेअर मीटर प्रमाणे निश्चित करून  निर्धारित वार्षिक भाडे मूल्य 22 ते 25 टक्के वाढवण्यात आले आहे. या  भाडे  मूल्यावर रहिवाशांनी हरकत घेतल्या मात्र त्यावर नावालाच सुनावणी घेतली. हरकत घेणाऱ्याचे समाधान न करता आता पैसे भरण्याची नोटीसा देण्यात येत आहेत.

या नोटीसामध्ये अनेक त्रुटी आहेत. पत्राच्या घरांना जादा कर तर स्लॅब असलेल्या घरांना कमी कर, घनकचऱ्याच्या 50-50 रुपयांच्या एकाच व्यक्तीस दोन नोटीसा अशा अनेक त्रुटी दिसून येत आहेत.एका रहीवाशास तर व्यापारी इमारतीस मालमत्ता कर 57 हजार 174 आला असून त्याच्या मुकाबल्यात 58 टक्के  म्हणजे 32 हजार 697 शिक्षण कर लावण्यात आल्याने त्या घरमालकाचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे. तर रोजगार कर 13 टक्के 7 हजार 686, वृक्षकर 5 टक्के 2 हजार 599,घनकचरा व्यवस्थापन कर म्हणून 50 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या पावत्या देण्यात आलेल्या आहेत.अशा अव्वाच्या सव्वा करामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

नगर परिषदेच्या वार्षिक भाडे मूल्यावर १ ते १० टक्के शिक्षण कर व मालमत्ता करावर एक टक्का वृक्ष कर त्याचप्रमाणे प्रती मालमत्ता घनकचरा पन्नास रुपये याप्रमाणे आणखी कर लावण्यात आले आहेत. वार्षिक भाडे मूल्यावर आकारण्यात येणारा शिक्षण कर शहरात कोठेही नगरपरिषदेच्या शाळा नसताना व कोठेच वृक्षलागवड नसताना वृक्ष कर आकारण्यात येत असल्याने या सर्व कराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नगरसेवक गप्पचनागरिकांना नगरपालिकेकडुन मनमानी कर लावण्यात आले असतांना नागरिक नगरसेवकांना याबाबत विचारणा करत आहेत. परंतु नगरसेवक याविरोधात काहीच बोलायला तयार नाहीत. यामुळे नगरसेवकांच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तोंडावर असलेल्या निवडणुकीत मत मागायला ये तेव्हा दाखवतो असे सूर नागरिकांमधून उमटत आहेत. 

सर्व कर सर्वांना लागू या करामधील फक्त मालमत्ता कर नगर परिषदेकडे व उर्वरित सर्व कर शासनाकडे चलनाद्वारे भरण्यात येतो. शाळा जरी सुरू नसल्या तरी शासनाचा हा कर सर्वाना लागू आहे.- विशाल भोसले ,मुख्याधिकारी

टॅग्स :TaxकरBeedबीडMuncipal Corporationनगर पालिका