जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर आणि प्रा. राजेंद्र कोरडे यांनी म्हटले आहे की, मोची पिंपळगाव येथील सारडा कन्ट्रक्शनच्या खडी क्रेशरमुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सदरील प्लॅन्ट इतर ठिकाणी हलविण्यात यावा. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार हा प्लॅन्ट इतर ठिकाणी उभारला जावा, धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते गोरख आखाडे, सखाराम आखाडे, विठ्ठल अवचार, नीलेश आखाडे, प्रताप आखाडे, वसीम सय्यद, बालाजी आखाडे, माणिक कोरडे, कैलास कोरडे यांच्यासह गावकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, नेते उपस्थित होते.
खडी क्रशरमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण; वंचितचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST