शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात चोरी; पाच तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:23 IST

पाटील गल्ली भागात राहणारे सतीश होके यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत हॉलचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे व १०० ग्राम चांदीचे दागिने लंपास केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील पाटील गल्ली भागात राहणारे सतीश होके यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत हॉलचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे व १०० ग्राम चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.होके यांच्या घरातून चोरटे बाहेर पडताना गल्लीतील लोकांनी त्याला पाहिले. मात्र इतर लोक जमा होईपर्यंत तो पसार झाला होता. त्यानंतर बाहेरील लोकांनी सतीश होके यांना आवाज देऊन उठवले असता हॉलमध्ये असलेल्या कपाटातील २० ग्राम सोन्याचे झुंबर, कानातील टॉप्स जोड ६ ग्राम, कानातील फुलजोड २ ग्राम, १२ ग्रामच्या तीन अंगठ्या, २० ग्रामचे मिनी गंठण, १०० चांदीचे चैनजोड आदी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.बीडमध्ये घरफोडी, ३१ हजारांचा ऐवज लंपासबीड : घराचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून आतमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा ३१ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरीची ही घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी अज्ञाताविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.रमेश केशवराव बिडवे यांचे शहरातील शिवाजीराव धांडेनगर येथे घर आहे. रविवारी ते कुटुंबासह पुणे येथे गेले होते. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ते घरी पोहोचले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील नगदी साडेदहा हजार, पाच ग्रॅमचे १५ हजार रूपये किंमतीचे सुवर्ण फुले व साडेपाच हजार रूपये किंमतीचे नवे कपडे असा ३१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान बिडवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

टॅग्स :jewelleryदागिनेtheftचोरी