शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:57 IST

तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट केल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

ठळक मुद्देचनईतांडा, दगडुतांडा येथे कारवाई : १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई : तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट केल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी, केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती, विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाई अंतर्गत चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती केंद्रांवर धाडी टाकून २ गुन्हे नोंदवले. सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत. महाराष्ट्र दारू बंदी कायद्यातंर्गत दोन्ही ठिकाणी बेवारस दोन गुन्हे नोंदविले आहेत. टाकलेल्या धाडीत चनईतांडा व दगडुतांडा येथे बेवारस स्थितीत ५ हजार ९७५ लिटर रसायन, १५ लिटर तयार हातभट्टी दारू, पाण्याची टाकी,२०० लिटरचे २७ बॅरल, पाच डब्बे, चार टोपली, दोन चाटु असा एकूण १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड, बि.के. पाटील, आर.ए. जारवाल, चालक के.एन.डुकरे हे सहभाग होते.

टॅग्स :BeedबीडExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारी