शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:51 IST

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आज सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला.

अंबाजोगाई (बीड ) :  महाराष्ट्राचे शक्तीपीठ  व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आज सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार  संतोष रूईकर  व सौ. कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

१० आॅक्टोबर ते १८ आॅक्टोबर या कालावधीत  श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तसीलदार संतोष रूईकर व सौ. कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी सचिव भगवानराव शिंदे, देवीचे पृथ्वीराज पुजारी, कृष्णा पुजारी, विश्वस्त, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम  कुलकर्णी यांच्यासह पुरोहित,  मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

विविध उपक्रमांची रेलचेलश्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदि उपक्रम सुरू झाले आहेत. आज दुपारी अंबाजोगाई येथे सहयोग महिला भजनी मंडळ, सोमेश्वर महिला भजनी मंडळ, संकटमोचन महिला भजनी मंडळ, वीरशैव महिला भजनी मंडळ, सत्संग महिला भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळ, दत्त मंदिर महिला भजनी मंडळ यांच्या संगित भजनाचा कार्यक्रम झाला. तर मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. श्रीकिसन महाराज पवार यांचे किर्तन झाले. यावेळी त्यांना वादनासाठी श्रीनिवास जगताप, प्रविण सलगर, व्यंकट धायगुडे, दामु भालेकर, माणिक तळणीकर, दीपक अदाटे, मुकुंद पवार यांनी साथसंगत केली. या सर्व उपस्थितांचे कलावंतांचे स्वागत योगेश्वरी देवल कमिटीचे विश्वस्त उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांनी केले.  

टॅग्स :Navratriनवरात्रीBeedबीडAmbajogaiअंबाजोगाई