बीड : तीन वर्षीय विधि अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटीद्वारे असून यासाठी अर्ज भरणे सुरू असल्याची माहिती स्वातंत्र्यसेनानी रामराव आवरगावकर विधि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. गोपाल यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी पदवीनंतर तीन वर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२१ आहे. ही परीक्षा १५० गुणांची असून विद्यार्थ्यांना १५० वैकल्पिक प्रश्न विचारले जातील. त्यांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम व मार्गदर्शन विधि महाविद्यालयाकडून केले जाणार आहे. या परीक्षेची तारीख राज्यस्तरीय सामायिक विधि अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा विभागाकडून घोषित करण्यात येईल. जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी शुल्क, अभ्यासक्रम आदी माहितीसाठी https://llb3cet2021.mahacet.org/ StaticPages/HomePage किंवा https://mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी स्वातंत्र्यसेनानी रामराव आवरगावकर विधि महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य प्रो. डॉ. डी. गोपाल यांनी केले आहे.
विधि अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज भरणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST