शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांचे उपोषण : परळी बस आगारातून एकही बस सोडली नाही, प्रवासी खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 13:00 IST

ST Bus Employee Hunger Strike: एसटीचे सर्व  कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज आगारातून एकही बस सुटू शकली नाही.

परळी ( बीड ) : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्यावतीने 27 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण ( ST Bus Employee Hunger Strike: ) सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून परळी येथे एसटी कामगारांनीही गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. एसटीचे सर्व  कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज आगारातून एकही बस सुटू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. 

वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उ चल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी ,दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज पहाटे 4.30 वाजेपासून परळी आगारातील गेटवर कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज परळी आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. सर्व युनियनचे सदस्य उपोषणात सामील झाले आहेत.

संयुक्त कृती समितीच्यावतीने मुंबई येथे चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून परळी आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग अवलंबिण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे नेते रमेश गीते यांनी दिली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे माजी संचालक भाजप नेते फुलचंद कराड ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी. मुंडे यांनी यांनी उपोषणस्थळी भेट दिली.  

टॅग्स :state transportएसटीStrikeसंपBeedबीड